मेढ्यातील जवानाचा शिलॉंगमध्ये आकस्मिक मृत्यू

मेढा – 22 मराठा बटालियन दलात शिलॉंग (मेघालय) येथे कार्यरत असणारे अशोक धनाजी जाधव (वय 36) रा. मेढा, ता. जावळी यांचा शिलॉंग येथे आकस्मित मृत्यू झाला. याबाबत घटनास्थळावरून सविस्तर माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही. त्यामुळे मृत्यूचे निश्‍चित कारण समजू शकले नाही.

दरम्यान, सोमवारी सकाळी 1.00 वाजता अशोक यांचा आकस्मित मृत्यू झाला, असे 22 मराठा बटालियन दलातील अधिकाऱ्यांनी अशोक यांचे भाऊ राकेश जाधव यांना कळविले. परंतु घटनास्थळावरील सविस्तर माहिती समजली नाही. अशोक यांचा शिलॉंगमध्ये मृत्यू झाल्याची माहिती मेढा या आणि त्यांच्या मूळ गावी उंबरी येथील ग्रामस्थांना सोमवारी संध्याकाळी समजली. दिवाळीच्या प्रारंभी समयीच घडलेल्या अशोक यांच्या निधनाने मेढा व परिसरातील गावांमध्ये शोककळा पसरली.

त्यांच्या पश्‍चात आई, पत्नी सुवर्णा, मुलगा, मुलगी, दोन बंधू असे आहेत. ते बालपणापासून मेढा, ता. जावळी येथे राहत होते. अशोक हे गेल्या 17 वर्षांपासून 22 मराठा बटालियन दलात कार्यरत होते. दरम्यान, अशोक यांचे पार्थिव बुधवार, दि. 7 रोजी मेढा येथेच वेण्णा नदीच्या काठावर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांचा कुटुंबीयांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)