मोहन भागवत यांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात

नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या ताफ्यातील पहिल्या वाहनाला अपघात झाला. वाहन पलटी होऊन सीआरपीएफचा एक जवान जखमी झाला आहे. चंद्रपुरमधील वरोऱ्यातील नांदुरी गावाजवळ एका गाईला धडक दिल्याने हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले आहे. मात्र, गाडीचे टायर फुटल्याने हा अपघात झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. मोहन भागवत सुखरूप आहेत.

जखमी जवानाला उपचारासाठी वरोरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तोपर्यंत मोहन भागवत स्वतः तिथे थांबले होते. यादरम्यान मोहन भागवत यांना सुखरूप नागपूरला पोहोचवण्यात आले आहे. ताफ्यातील इतर वाहने नागपूरला रवाना करण्यात आले आहेत. घटनास्थळी वरोरा पोलिसांनी तत्परता दाखवत पूलाखाली असलेली स्कार्पिओ गाडीला बाहेर काढली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)