पणजी – गोव्यातील दाबोळी विमानतळावर मिग 29 के या विमानाच्या इंधनाची टाकी कोसळून या टाकीने पेट घेतला. त्यामुळे दाबोळी विमानतळ दोन तासांसाठी बंद करण्यात आले होते. हवाई दलाचे मिग 29 के या विमानाची वेगळी होऊ शकणारी इंधनाची टाकी धावपट्टीवर कोसळली. त्यानंतर या टाकीने पेट घेतला. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून दाबोळी विमानतळ बंद करण्यात आले. ही आग सुमारे दोन तासांच्या प्रयत्नानंतर नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.
मिग 29के या हे विमान उड्डाण घेत असताना या विमानाची इंधनाची टाकी कोसळली आणि आग लागली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. इंधनाची टाकी खाली पडल्यावर त्या टाकीने पेट घेतला. त्यानंतर विमानतळावरची वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यानंतर आग नियंत्रणात आल्याने काही वेळात विमान वाहतूक पूर्ववत करण्यात आली, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. या घटनेनंतर विमानतळ परिसरात धुराचे लोट उठलेले पाहण्यास मिळाले.