कुंभमेळ्याहून परतताना भाविकांच्या बसला अपघात; तीन ठार 

जबलपूर  – कुंभमेळ्याहून नागपूरला परत येत असताना बसला झालेल्या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 39 जण जखमी झाले आहेत. हा अपघात कुंभमेळ्याहून जबलपूरमार्गे येणाऱ्या बसला पहाटे चारच्या सुमारास घडली. बस ओढ्यामध्ये पडल्याने हा अपघात झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

राहूल सेन (वय 20), मुरत लाल (24, दोघे रा. नागपूर) आणि रामू पाल (22, रा. चित्रकुट, उत्तर प्रदेश) अशी मृत्यांची नावे आहेत. बसमधील प्रवासी कुंभमेळ्याला गेले होते, ते प्रयागराजहून नागपूरला येत होते. या अपघातामागचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून चालकाचा तोल सुटल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. पोलीस पुढील तपास करत असून तपासाअंती नेमके कारण स्पष्ट होईल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मध्य प्रदेशमधील जबलपूरजवळील करोंदा नाल्यात ही बस अचानक उलटली आणि अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच याठिकाणी पोलीस दाखल झाले. तसेच रुग्णवाहीका मागवण्यात आल्या. यानंतर जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बसमधील भाविकांची ओळख पटवण्याचे काम सुरु असून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु करण्यात आले आहेत. ही बस करोंदा नाल्याच्या पुलावरून खाली पडल्याने तिला क्रेनच्या साह्याने बाहेर काढण्यात आले. अपघात झाला तेव्हा पहाटेची वेळ असल्याने सर्व प्रवासी झोपेत होते. यामध्ये अनेकांच्या डोक्‍याला मार लागून गंभीर दुखापत झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)