डंपरच्या धडकेत वीस वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

पिंपरी – भरधाव वेगातील डंपरने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना पिंपरीगाव येथे गुरुवारी (दि. 28) दुपारी घडली.

अक्षय किशोर मोटवानी (वय-20, हरिकृपा, डेअरी फार्मजवळ, पिंपरी) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. गौतम नागनाथ गायकवाड (वय-55, रा. नवमहाराष्ट्र शाळेजवळ, पिंपरीगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या डंपर चालकाचे नाव आहे. उपनिरीक्षक अशोक निमगिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय हा आपल्या दुचाकीवरून चालला होता. तो पिंपरीतील नवमहाराष्ट्र शाळेजवळ आला असता पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या डंपरने त्यांच्या दुचाकीस धडक दिली. या अपघातात अक्षय याचा जागीच मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)