हळगावमधील दोघांचा भीषण अपघातात मृत्यू

जामखेड – नगर – सोलापूर महामार्गावरील मांगी ( ता. करमाळा ) शिवारातील अवघड वळणावर ट्रक व मोटारसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला. जखमीवर नगर येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातात ठार झालेले दोघे जामखेड तालुक्‍यातील हळगांव येथील रहिवासी होते. कामावरून परतत असताना हा भीषण अपघात झाला. या घटनेने हळगावसह परिसरावर दु: खाचा डोंगर कोसळला आहे. हा अपघात शनिवारी सायंकाळी 7 च्या सुमारास झाला.

जामखेड तालुक्‍यातील हळगाव गावांतील गबारवस्ती येथील मथुरदास गोरख कापसे, बाबासाहेब रंगनाथ कापसे, कांतीलाल दादासाहेब कापसे हे तिघे तरूण शेतकरी रोजगारासाठी शेजारील करमाळा तालुक्‍यातील उजनी धरणाच्या बॅकवॉटर परिसरातील जेऊर भागात विहीर बांधकामाच्या कामासाठी गेले होते. शनिवारी जेऊरहून करमाळामार्गे हळगावकडे परत येत असताना सोलापूर-अहमदनगर मार्गावरील मांगी शिवारात असलेल्या टोलनाक्‍याच्या पुढील अवघड वळणावर मोटारसायकलला कंटनेरने जोराची धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की मोटारसायकलचा अक्षरश: चक्काचूर झाला. या भीषण अपघातात मथुरदास कापसे हा तरूण जागीच ठार झाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अपघातात गंभीर जखमी झालेल्या बाबासाहेब कापसे व कांतीलाल कापसे या अन्य दोघांना करमाळ्यातील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नगर येथील खाजगी दवाखान्यात हलविण्यात आले होते. नगर येथून हळगावला आणल्यानंतर बाबासाहेब कापसे यांचे काही वेळातच निधन झाले. मृतक मथुरदास कापसे व बाबासाहेब कापसे हे दोघे एकाच वस्तीवर राहणारे तरूण होते. अपघातात दोघांचा झालेल्या दुदैर्वी मृत्यूने हळगाव परिसरावर दु: खाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान या अपघातातील जखमी कांतीलाल दादासाहेब कापसे याच्यावर अहमदनगर येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)