बसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

पिंपरी – बस आणि दुचाकीच्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (दि.11) दुपारी पावणेतीनच्या सुमारास दिघी येथील देहूफाटा येथे घडला.

कैलास काशिनाथ नाईक (वय-24, रा. केळगाव रोड, आळंदी देवाची) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलास त्यांच्या ऍक्‍टिव्हा दुचाकीवरून जात होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दिघी येथील देहूफाटा येथे आला असता त्याची बसला धडक बसली. यामध्ये कैलास गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. दिघी पोलीस अधिक तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)