ट्रकची दुचाकीला धडक, महिला जागीच ठार

वाठार स्टेशन – लोणंद ते सातारा महामार्गावर वाठार स्टेशननजिक कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकची दुचाकीला धडक असली. या अपघातात दुचाकीवरील महिला जागीच ठार झाली तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी प्रमोद भंडलकर (वय 30 रा. हिंगणगाव, ता. फलटण) हे पत्नी सौ. चैताली प्रमोद भंडलकर वय ( 24 रा. हिंगणगाव यांना घेऊन दुचाकीवरून (एमएच 11- सीएम 1517) सातारा बाजूकडे निघाले होते. दुपारी 4 च्या सुमारास वाठार स्टेशन नजिक भारत पेट्रोल पंपाजवळ पाठीमागून येणारा ट्रकने (एमएच 46 एफ 5730) जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील सौ. चैताली या जागीच ठार झाल्या तर दुचाकीचालक प्रमोद भंडल गंभीर जखमी झाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जखमी प्रमोद यांना प्राथमिक आरोग्य केंद्र वाठार स्टेशन येथे दाखल केले. व चैताली यांच्या मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपोडे बुद्रुक येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. घटनेची नोंद वाठार पोलीस स्टेशन येथे झाली असून पुढील तपास सुरू आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)