टॅंकर-दुचाकी अपघातात पिता-पुत्र ठार

file photo

सुपे – पारनेर तालुक्‍यातील सुपे-वाळवणे रस्त्यालगत-आपधूप फाट्यावरील सबस्टेशनजवळ मुलाला शाळेत सोडविण्यासाठी चाललेल्या पित्यासह मुलाला भरधाव वेगात असलेल्या पाण्याच्या टॅंकरने चिरडले. यात दोघांचाही जाग्यावरच मृत्यू झाला. सतिष कसबे ( वय-40) व सौरव सतिष कसबे (वय-15) (रा. आपधूप) असे मयत पिता-पुत्राचे नाव आहे.

सतिष विठ्ठल कसबे दुचाकीवरून नववीत शिकणाऱ्या सौरवला शाळेत सोडवण्यासाठी सुपे येथे जात होते. सुपे-आपधूप रोडवरील सबस्टेशनजवळ पाणी भरण्यासाठी येत असलेल्या टॅंकरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने पिता-पुत्रांचा दुदैवी अंत झाला. ही घटना सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेचा आवाज झाल्यानंतर कोल्हे वस्तीवरील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले.

दरम्यान सतिश कसबे यांच्यावर घरातील सर्वांची जबाबदारी होती. अतिशय गरिब परिस्थिती असल्याने ते रोजंदारी करून आपल्या कुटुंबाचा सांभाळ करत होते. त्यांच्या पश्‍चात एक मुलगी, दोन भाऊ, वडील, एक बहीण असा परिवार आहे.
घटनेची माहिती सुपे पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी येवून पंचनामा केला. मयत सतिश व मुलगा सौरव यांना पुढील कारवाईसाठी पारनेर येथील रुग्णालयात पाठवण्यात आले.

याबाबत सुपे पोलीस ठाण्यात टॅंकर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढिल तपास सुपे पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक संजयकुमार सोने हे करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)