वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू

संगमनेर – रिक्षाची वाट पाहात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या इसमाला भरधाव वेगात जाणाऱ्या अज्ञात ठोकरले. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रविवारी (दि. 2) रात्री साडेदहाच्या सुमारास घुलेवाडी येथील दंत महाविद्यालयासमोर घडली.

प्रताप धनसिंग असे अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी मीना बहादूर धनसिंग (रा. मुंबई) यांच्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
दुसऱ्या घटनेत दुचाकीवरचा ताबा सुटून विजेच्या खांबाला डोके आदळून एकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना तालुक्‍यातील रायते येथील देवठाण रस्त्यावरील लक्ष्मी चौकात काल रविवारी (दि. 2) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली.

-Ads-

मच्छिंद्र अशोक कोटकर (वय 38, रा. देवठाण) असे अपघातात मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. कोटकर सकाळी संगमनेरहून देवठाणकडे दुचाकीवरून (क्र. एमएच- 17 बी- 9102) जात होते. देवठाण रस्त्यावरील लक्ष्मी चौकात त्यांचा गाडीवरील ताबा सुटला व रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबाला जाऊन गाडी आदळली. यात कोटकर यांच्या डोक्‍यास जबर मार लागला. त्यांना संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले. मयत कोटकर यांच्या पश्‍चात आई-वडील, पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)