पुणे-नाशिक महामार्गावर ट्रकचा अपघात

आंबी-खालसा फाट्यावर आठ तास वाहतूक विस्कळीत

संगमनेर – तालुक्‍यातील पुणे-नाशिक महामार्गावर आंबी खालसा फाटा येथे ट्रक चालकाला गतिरोधकाचा अंदाज न आल्याने ट्रक दुभाजकाच्या पलीकडे जात नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरवर आदळला. त्यामुळे पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक आठ तास विस्कळीत होती. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून, अपघातामध्ये सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.

-Ads-

अपघात गुरूवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास झाला. अपघातग्रस्त वाहने बाजूला घेण्यास अडथळा होत असल्याने आठ तास आंबी खालसा फाटा परिसरात एकेरी वाहतूक सुरू होती. प्रवाशांचे मोठे हाल झाले. अपघाताची माहिती समजताच डोळासणे महामार्ग पोलीस कर्मचारी रमेश शिंदे, साईनाथ दिवटे, जानकीराम खेमनर, अरविंद गिरी, संदीप आघाडे तात्काळ घटनास्थळी पोहचले. ठप्प झालेली वाहतूक त्यांनी सुरळीत केली.

अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहायाने बाजूला घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याने, आंबी खालसा फाटा परिसरात एकेरी वाहतूक सुरू होती. आंबी खालसा फाटा येथील पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर उताराला बसवलेला गतीरोध चालकांच्या लक्षात येत नसल्याने गतीरोधकाची उंची कमी करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)