रुईछत्तीशीमधील बापलेकांचा अपघाती मृत्यू

नगर – सोलापूर रस्त्यावरील आंबीलवाडी गावाच्या शिवारात भरधाव वेगातील दुचाकी पुलाजवळ कोसळून झालेल्या अपघातात रुईछत्तीशी (ता. नगर) येथील बापलेकाचा मृत्यू झाला. बाळू सोपान छत्तीसे (वय 40) व सोपान लक्ष्मण छत्तीशे (वय 60) असे मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. नगर तालुका पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली आहे.

बाळू आणि सोपान हे दोघे बापलेक दुचाकीवरून रुईछत्तीशी (ता. नगर) गावाकडे चालले होते. बाळू हा वेगाने दुचाकी चालवित होता. आंबलवाडी शिवारातील पुलाजवळ दुचाकी येताच, बाळूचा दुचाकीवरचा ताबा सुटला.

-Ads-

दुचाकी पुलाखाली जाऊन कोसळली. यात दोघे गंभीर जखमी झाले. यात या दोघांचा जागीच मृत्यू झाला. संतोष सोपान छत्तसे यांच्या फिर्यादीवरून बाळू याच्याविरोधात अपघाताच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)