कार-दुचाकीच्या अपघातात दोघांचा मृत्यू

शिर्डी- नाशिक-शिर्डा मार्गावर के. के. मिल्क जवळ कार व मोटारसायकलच्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. नवनाथ चंद्रभान कुसळकर व चांगदेव आहिरे, अशी मृतींची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक-शिर्डी मार्गावर मंगळवारी (दि.30) सायंकाळी सातवाजेच्या सुमारास स्विफ्ट कार तसेच मोटारसायकलचा (क्र. एमएच- 17 ई-7821) भीषण अपघात झाला. मोटारसायकलवरील नवनाथ कुसळकर व चांगदेव आहिरे हे दोघे जबर जखमी झाले.

कुसळकर यांचा साईनाथ सुपर स्पेशालिटी रुग्णालयात, तर आहिरे यांचा लोणी येथे उपचारासाठी घेऊन जाताना मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ऐन दिवाळी सणादरम्यान दोघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)