डिझेल टॅंकरच्या स्फोटात एक ठार, एक गंभीर जखमी

श्रीगोंदा  – रिकाम्या डिझेल टॅंकरची दुरुस्ती करताना स्फोट होऊन संदीप संभाजी भालेकर (वय 35) या तरुणाचा मृत्यू झाला, तर गणेश गायकवाड हे गंभीर जखमी झाले. ही घटना देवदैठण येथे गुरूवारी (दि.22) दुपारी घडली.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, देवदैठण येथे संदीप भालेकर यांचे वडिलोपार्जित वेल्डिंगचे दुकान आहे. येथील गणेश गायकवाड यांनी टॅंकर (एमएच- 12 सीएच- 4887) दुरुस्तीसाठी आणला होता. पूर्वी या टॅंकरद्वारे डिझेलची वाहतूक करण्यात येत होती. या टॅंकरचा आतील पत्रा कापण्याचे काम वेल्डिंगद्वारे भालेकर करत होते.

-Ads-

मात्र काही वेळानंतर टॅंकरचा मोठा स्फोट झाला. यात भालेकर यांच्यासह गायकवाड गंभीर जखमी झाले. स्फोटानंतर भालेकर यांना टॅंकरमधून बाहेर काढणे अवघड बनल्याने जेसीबीच्या साह्याने टॅंकरचा पत्रा फाडून त्यांना बाहेर काढण्यात आले.

जखमी अवस्थेत भालेकर व गायकवाड यांना उपचारासाठी शिरूर येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डोक्‍याला गंभीर मार लागल्याने व मेंदूतून रक्तस्त्राव झाल्याने उपचारादरम्यान भालेकर यांचा मृत्यू झाला. गायकवाड यांच्यावर उपचार सुरू आहेत.

भालेकर यांच्या पश्‍चात आई, वडील, एक मुलगा, एक मुलगी, असा परिवार आहे. घरातील कमावती व्यक्ती गेल्याने भालेकर कुटुंबावर आकाश कोसळले आहे. याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर घुगे, हवलदार रावसाहेब शिंदे, गोरख गायकवाड पुढील तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)