चारचाकी झाडावर आदळून तरुण जागीच ठार

श्रीगोंदा : तालुक्‍यातील लोणी व्यंकनाथ – चिंभळे रस्त्यावर शिरोळेवस्तीजवळ चारचाकी झाडाला धडकल्याने अपघात झाला. या अपघातात वैभव दिवटे (रा.रुईछत्रपती,ता.पारनेर) हा तरुण जागीच ठार झाला. हा अपघात शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडला.

याबाबत समजलेली माहिती अशी की, वैभव दिवटे (रा.रुईछत्रपती, ता.पारनेर) हा तरुण महिंद्रा स्कॉर्पिओ (एम.एच. 16. एटी. 5415) लोणी व्यंकनाथकडून चिंभळ्याकडे चालली होती. दुपारी दोन वाजेच्या सुमारास शिरोळेवस्तीजवळ गाडी खड्डयात आदळल्याने झाडावर जाऊन धडकली.

“लोणीव्यंकनाथ ते चिंभळे रस्ता निम्मा कच्चा असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या पंधरा दिवसांत या रस्त्यावर तीन अपघात झाले आहेत. एकदा चारचाकी पलटी झाली तर आता चारचाकी झाडावर आदळली. लोणीव्यंकनाथ ते चिंभळे रस्त्याचे उर्वरित डांबरीकरण होणे गरजेचे आहे.
– अजित गायकवाड, चिंभळे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ही धडक इतकी जोरात झाली की या अपघातात वाहनचालक वैभव दिवटे याचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर घटनास्थळी जमलेल्या लोकांनी डॉक्‍टरांना आणले मात्र त्यापूर्वीच वैभव दिवटे याचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, लोणीव्यंकनाथ ते चिंभळे निम्म्या रस्त्याचे डांबरीकरण झालेले आहे. मात्र निम्मा रस्ता कच्चा आहे.रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)