चिखली घाटाजवळील अपघातात तीन ठार

चिखली (ता.श्रीगोंदे) : नगर-दौंड मार्गावर चिखली घाटाजवळ मारुती मोटार व ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. त्यात मारुती मोटारीचा चक्काचूर झाला. (छाया-अर्शद शेख)

श्रीगोंदे – श्रीगोंदे तालुक्‍यातील चिखली घाटाजवळ मारुती मोटार व ट्रकमध्ये बुधवारी दुपारी भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले, तर एक जणाचा रुग्णालयात मृत्यू पावला.

नगर-दौंड मार्गावर झालेल्या या अपघात मृत पावलेले व्यक्तींची नावे पुढीलप्रमाणे- अशोक पवार (चिंचोडी पाटील ता.नगर), सागर दहातोंडे (रा.साले वडगाव ता. आष्टी जि.बीड), उन्मेष मोरे (रा.आठवड ता. नगर). वरील तिघे हे मारुती मोटारीतून दौंडच्या दिशेने निघाले होते. चिखली घाटाजवळ आल्यानंतर समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या मुरूम वाहतूक करणाऱ्या ट्रकला कारची धडक बसली. या भीषण अपघाताचा जोरात आवाज झाल्याने परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. बेलवंडी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या अपघातात मारुती मोटारीचा चक्काचूर झाला. मोटारीत अडकलेल्या तिघांना बाहेर काढण्यासाठी उपस्थितांनी मदतकार्य सुरू केले. या गाडीतील दोघांचा तर जागीच मृत्यू झाला होता. एकाची प्रकृती नाजूक होती. त्यास तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. या प्रकरणी बेलवंडीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पडवळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पुढील तपास बेलवंडी पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)