पुणे – 6 महिन्यांत 205 बळी

विस्कळीत वाहतूक; वाढते अपघात

194 प्राणांतिक, तर 284 गंभीर घटनांनी डोके सुन्न

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे – वाढती वाहन संख्या, विस्कळीत वाहतूक, नियमांचे पालन न करण्याची आडमुठी मानसिकता यामुळे अपघातांच्या प्रमाण प्रचंड वाढले असून गेल्या सहा महिन्यांत पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांतर्गत 140 अपघातांत 148 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर, शहर हद्दीतून जाणाऱ्या सहा महामार्गांवरील एकूण 54 अपघातांत 57 जणांचा बळी गेल्याचे समोर आले आहे.

शहरातील अरुंद रस्ते, अतिउत्साही वाहनचालक, हेडफोन लाऊन वाहन चालविणे या प्रमुख कारणांनी रस्ते अपघात वाढले आहेत. अनेकजण मृत्यूूमुखी पडतात तर काहींना कायमचे अपंगत्व येते. शहरातील अपघातांसह लगतच्या सहा महामार्गांवरील अपघातांची आकडेवारी डोके सुन्न करणारी आहे. रस्ते सुरक्षा सप्ताहानिमित्त जनजागृती, फलकबाजी केली जाते. मात्र, भरधाव वाहन चालविणाऱ्यांचे या फलकाकडे लक्ष नसते. अपघातानंतर उपाययोजनांची चर्चा होते. परंतु, बहुतेकदा कार्यवाही ही लालफितीत अडकली जाते.

यावर्षी जानेवारी ते जूनदरम्यान महामार्गांवरील 54 अपघातात 57 जणांना जीव गमवावा लागला आहे. यात सर्वाधिक अपघात बंगळूरू महामार्गावर झाले असून त्यात 27 जणांचा मृत्यू झाला आहे. तर पिंपरी-चिंचवड आणि शहरांतर्गत असलेल्या रस्त्यावर झालेल्या अपघातातही 148 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

सुरळीत वाहतूक सामूहिक जबाबदारी आहे. सर्वांनी वाहतूक नियम पाळायला हवेत. वाहतूक पोलिसांकडून अपघाताविषयी विविध ठिकाणी जनजागृती केली जात आहे. अपघातांची चित्रफीतदेखील दाखवण्यात येते. “स्मार्ट सिटी’ बनवायची असल्यास स्वतः “स्मार्ट’ होणे गरजेचे आहे.
– प्रभाकर ढमाले, सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक विभाग.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)