कोचीत नौदल तळावर दुर्घटना; दोन जवानांचा मृत्यू

कोची: केरळ येथील कोची नौदलाच्या तळावर झालेल्या एका अपघातात नौदलाच्या दोन जवानांचा मृत्यू, तर तीन जण जखमी झाले आहेत. हा अपघात आज सकाळी साडेनऊच्या सुमारास घडला. या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

नवीन (वय 28) आणि अजित सिंग (29) असे मृत्यू झालेल्या जवानांची नावे आहेत. याबाबत नौदलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरचे हॅंगरचे सरकते दरवाजे निखळून ते जवानांच्या अंगावर पडले. त्यात नवीन आणि अजित सिंग यांच्यासह काही जवान गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान दोन जवानांचा मृत्यू झाला. या दुघटनेची नौदलाने तातडीने दखल घेत याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, नवीन हा हरियाण येथील असून तो 2008पासून नौदलात कार्यरत होता. त्याच्या पश्‍चात पत्नी आणि दोन वर्षांचा मुलगा आहे. तर अजित सिंग हा राजस्थानमधील भरतपूर जिल्हयातील रहिवाशी आहे. तो गतवर्षीच नौदलात सहभागी झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)