शेजाऱ्याच्या नावे केलेले ईच्छापत्र ग्राह्यच (भाग-२)

शेजाऱ्याच्या नावे केलेले ईच्छापत्र ग्राह्यच (भाग-१)

चार दिवसापूर्वी निकाल झालेल्या शेवंताबाई विरूध्द अरुण व ईतर या खटल्यात मयत पतीने शेजारच्या व्यक्तीच्या नावे आपली शेतजमीन व घरमिळकत दोन्हीही ईच्छापत्राद्बारे नावे केली. त्यामुळे त्याच्या पत्नीने मी आता वयस्कर झाली असुन मला माझ्या उदरनिर्वाहाचे साधन नाही त्यामुळे सदर ईच्छापत्र रद्द करुन सर्व संपत्ती आपल्या नावे करावी म्हणुन न्यायालयात ईच्छापत्राला आव्हान दिले. कनिष्ठ न्यायालयाने तिचे म्हणण्याप्रमाणे दावा मान्य करीत शेजारच्या व्यक्तीच्या नावे केलेली सर्व संपत्ती तिला परत करण्याचा आदेश देत सदर ईच्छापत्र रद्दबातल ठरविले.

ज्याच्या नावे ईच्छापत्र झाले ती व्यक्ती अपीलात गेली त्यानंतर अपीलामधे अपीलकर्त्याची बाजु ऐकुन घेवुन अपीलेट न्यायालय व उच्च न्यायालय या दोन्ही न्यायालयानी “फक्त शेजारच्या व्यक्तीच्या नावे ईच्छापत्र केले म्हणुन ते अवैध ठरत नाही “असा निर्णय देत ईच्छापत्राला आव्हान देणारा त्या वयस्कर पत्नीचा दावा फेटाळुन लावला व अपील मंजुर करीत ज्याचे नावे मृत्युपत्राद्वारे संपत्ती दिली आहे, त्याचेच नावे संपत्ती राहील. अपीलामधे ज्या व्यक्तीच्या नावे ईच्छापत्र केले आहे त्या व्यक्तीने ईच्छापत्र केलेल्या पतीच्या विधवा पत्नीला उदरनिर्वाहासाठी तीन हजार रुपये पोटगी देण्याची तयारी दर्शविली होती व घरात राहण्यास परवानगी देण्याची तयारी दर्शवली. अगोदर पोटगी घेण्यास नकार देणाऱ्या महिलेच्या वकिलानी सर्वोच्च न्यायालयात ती महिला पोटगी घेण्यास तयार असुन ती वाढविणेत यावी अशी मागणी केली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने शेतीच्या उत्पन्नातुन हि रक्कम चार हजार वाढवुन 7500 /- प्रतिमाह देण्याचा आदेश अपील कर्त्याला दिला. एकुणच या निकालाने ईच्छापत्र अथवा मृत्युपत्राचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)