गैरहजर, लेटलतिफांवर कारवाईची कुऱ्हाड

पीएमपी वर्कशॉपला नयना गुंडे यांची “सरप्राईज व्हिजीट’
सुटीदिवशी वर्कशॉपची पाहणी, अधिकाऱ्यांची बैठक कामावर न येणे, उशिरा येणाऱ्यांवर कारवाई
पुणे – कर्मचाऱ्यांबाबत सातत्याने तक्रारी येत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर पीएमपीच्या अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी स्वारगेट येथील सेंट्रल वर्कशॉपला शनिवारी अचानक भेट दिली. यावेळी नियोजित वेळेपेक्षा उशिरा कामावर येणे आणि गैरहजर राहणाऱ्या जवळपास 40 ते 50 कर्मचारी आढळून आले. यामुळे संतापलेल्या गुंडे यांनी सुट्टीदिवशी तत्काळ अधिकाऱ्यांची बैठक बोलावत संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
पीएमपी बसेसचे गेल्या काही दिवसांत “ब्रेकडाऊन’ वाढले आहे. ही बाब गुंडे यांनी गंभीरतेने घेतली असून परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

जुन्या बसेसची देखभाल दुरुस्ती करणे, इंजिनचे कामे, गिअर बॉक्‍स, ब्रेक यंत्रणा दुरुस्ती करण्यासाठी स्वारगेट येथील मुख्य इमारतीत मध्यवर्ती वर्कशॉप आहे. येथे सुमारे 145 कर्मचारी असून बसेसशी संबंधित सर्व महत्वपूर्ण कामे या येथे केली जातात. यामुळे या वर्कशॉपला महत्व आहे. याठिकाणचे कर्मचारी ठरवून दिलेले काम वेळेत करत नसल्याच्या अनेक तक्रारी प्रशासनाकडे आल्या होत्या. या पार्श्‍वभूमीवर गुंडे यांनी सुट्टीच्या दिवशी वर्कशॉपला भेट दिली. यावेळी अनेक कर्मचारी उशिरा येत असल्याचे गुंडे यांना दिसून आले. तसेच अनेक कर्मचारी सुट्टीवर असल्याचेही दिसून आले. जवळपास 40 ते 50 कर्मचारी असे आढळल्याने गुंडे यांनी ही बाब गंभीरतेने घेत कारवाईचे आदेश दिले. यासाठी सुट्टीच्या दिवशी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वर्कशॉपमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सकाळी 8 ते 4 या वेळेत कामावर येणे गरजेचे असते. मात्र, अनेक कर्मचारी उशीरा कामावर येत असल्याचे निदर्शनास आले. तर काही कर्मचारी सुट्टीवर असल्याचे दिसून आल्याने आता या सर्वांची चौकशी होणार असल्याचे पीएमपीतील अधिकाऱ्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)