अमिताभ बच्चन यांच्याबरोबर अबरामची मैत्री

शाहरुखचा मुलगा अबराम आणि बिग बी अमिताभ बच्चन यांच्यात मस्त मैत्री झाली आहे. अमिताभ बच्चन हे शाहरुखचे पप्पा म्हणजेच अबरामचे आजोबा आहेत, असे अबराम समजायला लागला आहे. 2001 मधील “कभी खुशी कभी गम’मध्ये अमिताभ बच्चन यांनी शाहरुखच्या वडिलांचा रोल केला होता. तो सिनेमा अबरामने बघितला होता. त्यामुळेच तो अमिताभ बच्चन यांना आपले आजोबा समजायला लागला आहे.

अगदी अलिकडे बच्चन यांची नात अराध्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित पार्टीमध्ये शाहरुखने अमिताभ यांची आणि अबराम यांची भेट घालून दिली होती.त्यावेळचा फोटो अमिताभ यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यामध्ये छोट्या अबरामला वाटणारी शंकाही त्यांनी सांगितली आहे. शाहरुखचे आब्बा आपल्यासोबतच का रहात नाही, असा बालसुलभ प्रश्‍नही अबरामने उपस्थित केला होता, असे बच्चन यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितले आहे. अर्थात याच्यावर बच्चन किंवा शाहरुख यांनी अबरामला काय उत्तर दिले, याचा मात्र इन्स्टाग्रामवरच्या पोस्टमध्ये उल्लेख नाही. बच्चन आणि शाहरुख यांनी “मोहोब्बतें’, “वीर झारा’, “पहेली’, “कभी अलविदा ना कहना’ आदी सिनेमांमध्ये एकत्र काम केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)