आबेदा इनामदार महिला क्रिकेट स्पर्धा : वेरॉक, वूमन्स स्पोर्टस अकादमी उपांत्य फेरीत

एचपी अकादमी, पंजाबचे आव्हान संपुष्टात

पुणे – आझम स्पोर्टस अकादमीच्या वतीने आयोजित आबेदा इनामदार ऑल इंडिया निमंत्रित महिला क्रिकेट स्पर्धेत वेरॉक क्रिकेट अकादमी संघाने हेमंत पाटील क्रिकेट अकादमी, तर वूमन्स स्पोर्टस अकादमीने पंजाब संघाला पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. या स्पर्धा आझम स्पोर्टस अकादमीच्या मैदानावर खेळविण्यात येत आहेत.

वेरॉक क्रिकेट अकादमीने हेमंत पाटील अकादमीला 5 गडी राखून पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना हेमंत पाटील संघाने निर्धारित 20 षटकांत 6 बाद 110 धावा केल्या. चार्मी गवईने 24 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 28, तर तंजीला शेखने 28 चेंडूत 23 धावांची (2 चौकार) खेळी केली. पूनम खेमणारने आक्रमक फलंदाजी करताना 4 चौकारांच्या सहाय्याने 22 धावा केल्या. वैष्णवी पाटीलने 3, तर स्वांजली मुळे व श्रद्धा पोखरकर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

वेरॉक संघाने 17.3 षटकांत 5 बाद 111 धावा करत विजय साकारला. काश्‍मीरा शिंदेने 18 (16 चेंडू, 1 चौकार), ऋतुजा गिलबिलेने 17 (20 चेंडू, 2 चौकार), साक्षी वाघमोडेने 16 (18 चेंडू, 1 चौकार) तर श्रद्धा पोखरकरने 15 (12 चेंडू, 2 चौकार) धावा करताना संघाच्या विजयात मोलाचा हातभार लावला. वैष्णवी काळे व पूनम खेमनार यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. वैष्णवी पाटीलला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

वूमन्स क्रिकेट अकादमीने पंजाब संघाचा 37 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना वूमन्स क्रिकेट अकादमीने निर्धारित 20 षटकांत 8 बाद 117 धावा केल्या. निकिता भोरने 28 चेंडूत 34 (6 चौकार) धावांची खेळी केली. नीलम पाटीलने 34 चेंडूत 6 चौकारांच्या सहाय्याने 32 धावा केल्या. इशा चौधरीने भेदक गोलंदाजी करताना 3 गडी बाद केले. नीलम बिश्‍त, संगीता सिंधू व अंबिका पांजला यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

विजयासाठी आवश्‍यक असलेले आव्हान पंजाब संघाला पेलवले नाही. पंजाब संघाचा डाव 14.4 षटकांत 80 धावांवरच गुंडाळला. कर्णधार मोनिका पांडेने 21 (18 चेंडू, 3 चौकार) धावांची खेळी करत एकाकी झुंज दिली. शिरीन खानने 13 (2 चौकार), तर अंबिका पांजलाने 12 धावा केल्या. निकिता आगेने 4 गडी बाद करताना संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. निकिता भोर व वैष्णवी रावलीया यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. निकिता भोरला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

संक्षिप्त धावफलक : हेमंत पाटील क्रिकेट अकादमी : 20 षटकांत 6 बाद 110 (चार्मी गवई 28 (24 चेंडू, 4 चौकार), तंजीला शेख 23 (28 चेंडू, 2 चौकार), पूनम खेमनार 22 (16 चेंडू, 4 चौकार) वैष्णवी पाटील 3-0-10-3, स्वांजली मुळे 4-0-23-1, श्रद्धा पोखरकर 4-0-28-1) पराभूत विरुद्ध वेरॉक क्रिकेट अकादमी : 17.3 षटकांत 5 बाद 111 (काश्‍मीरा शिंदेने 18 (16 चेंडू, 1 चौकार), ऋतुजा गिलबिलेने 17 (20 चेंडू, 2 चौकार), साक्षी वाघमोडेने 16 (18 चेंडू, 1 चौकार) तर श्रद्धा पोखरकरने 15 (12 चेंडू, 2 चौकार) वैष्णवी काळे 4-0-24-2, पूनम खेमनार 3.3-0-25-2, इनाक्‍शी चौधरी 3-0-12-1).

वूमन्स क्रिकेट अकादमी : 20 षटकांत 8 बाद 117 (निकिता भोर 34 (28 चेंडू, 6 चौकार), नीलम पाटील 32 (34 चेंडू, 6 चौकार), इशा चौधरी 4-0-21-3, नीलम बिश्‍त 4-0-24-1, संगीता सिंधू 3-0-16-1, अंबिका पांजला 4-0-13-1) पराभूत विरुद्ध पंजाब : 14.4 षटकांत सर्वबाद 80 (मोनिका पांडे 21 (18 चेंडू, 3 चौकार), शिरीन खान 13 (2 चौकार), अंबिका पांजला 12 (2 चौकार), निकिता आगे 4-0-11-4, निकिता भोर 3-0-15-2, वैष्णवी रावलीया 2-0-12-2).

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)