गतविजेता अभिषेक मिश्राला चौथ्यांदा डेझर्ट स्टॉर्मचे विजेतेपद

ऍड्रीयन मेटगेला मोटो गटाचे जेतेपद

जैसलमेर – गतविजेता अभिषेक मिश्राने याने यावर्षी देखील आपला फॉर्म कायम ठेवत डेझर्ट स्टॉर्मचे सलग चौथ्यांदा जेतेपद मिळवले. जयपूरच्या असलेल्या 30 वर्षीय अभिषेक हा या स्पर्धेचे जेतेपद राखणारा तिसरा चालक ठरला आहे. एफएमएससीआय मान्यताप्राप्त या स्पर्धेत यापूर्वी सनी सिद्धू आणि सुरेश राणा यांना आपले जेतेपद कायम राखण्यात यश मिळाले होते. सह चालक श्रीकांत गौडासोबत अभिषेकने 9 तास 21 मिनिटे आणि 45 सेकंद वेळ नोंदवत चमक दाखवली.

मोटो गटात टीम टिव्हीएस रेसिंगच्या ऍड्रीयन मेटगेने मोटो गटात चमक दाखवली. त्याने देशातील सर्वात मोठ्या मोटरबाईक रॅलीत 6 तास 13 मिनिटे आणि 25 सेकंद वेळेसह चमक दाखवली. तर, अंकुर चौहान (सह चालक प्रकाश एम.)याने एंडयुर गटात बाजी मारली.आमच्यासाठी हा विजय विशेष आहे असे मारुती विटारा चालविणारा अभिषेक।म्हणाला. मी फोर व्हीलर गटात चार वेळा जेतेपद मिळवले. तर, एकदा मोटरबाईक गटात बाजी मारली.अनेक आघाडीच्या चालकांचा सहभाग व त्यामुळे निर्माण झालेल्या स्पर्धेमुळे स्पर्धा आव्हानात्मक होती. अनेक आघाडीचे संघ व कंपन्या देखील यामध्ये सहभागी होत्या असे अभिषेक म्हणाला.

टोयोटा फॉर्च्युनर घेऊन सहभागी झालेल्या चंदीगडच्या सम्राट यादवने (सह चालक कुणाल कश्‍यप)09:41:34 वेळेसह दुसरे स्थान मिळवले.अरुणाचल प्रदेशचा लाखपा त्सेरिंग (सह चालक वि. वेणू रमेशकुमार) याने पोलरीस आरझेडआर 1000 सह तिसरे स्थान मिळवले.आर्मी संघाने देखील डेझर्ट स्टॉर्म स्पर्धेत चमक दाखवली. कॅप्टन एव्हीएस गिल(सह चालक दिवाकर कालिया) यांनी एक्‍स्ट्रीम गटात चौथे स्थान तर, अमन कटोच (सिद्धार्थ नांदल), पार्थ भारद्वाज (मोहित बिष्ट) व संजय जादोन (साहिल दुआ) यांनी एनड्युअर गटात तिसरे, चौथे व पाचवे स्थान मिळवले.

भारताचा डकार स्टार म्हणून ओळख असलेल्या सी एस संतोष याला प्रत्येक स्तरावर ऍड्रीयन मेटगेने मागे टाकले त्याने त्यामुळे मोटो गटात त्याला दुसऱ्या स्थानी रहावे लागले.होंडा मोटरस्पोर्टसच्या या खेळाडूला मेटगेच्या आघाडीपुढे काहीच करता आले नाही. टीव्हीएस रेसिंगच्या अब्दुल वाहिद तन्वीरने 06:35:28 वेळेसह तिसरे स्थान मिळवले.

बमिश्रा, मेटगे आणि चौहान यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. जैसलमेर मॅरीएट रिसोर्टस अँड स्पा येथे बक्षीस वितरण समारंभ पार पडला.प्रत्येक विजेत्याला 50 अंश सेल्सिअसच्या आसपास तापमानात सहभाग नोंदवल्याने विशेष पुरस्कार देण्यात आले.टीम गटात (एक्‍स्ट्रीम गटात) टीम आर्मी ऍडव्हेंचर विंग चमक दाखवली. मोटो गटात टिव्हीएस रेसिंगला, एनड्युअर गटात टीम आर्मी ऍडव्हेंचर विंग यांनी चमक दाखवली. कोप डेस डामेस ( सर्वोत्त महिला स्पर्धक) पुरस्कार एक्‍स्ट्रीम गटात ख्याती मोदी, मोटो गटात ऐश्वर्या पिसे आणि एनड्युअर गटात गटात अभिलाषा सिंगने बाजी मारली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)