अभिनव बिंद्रा सर्वोच्च ब्लू क्रॉस पुरस्काराने सन्मानित

नवी दिल्ली – भारताला ऑलिंपिकमध्ये पहिले आणि एकमेव सुवर्णपदक मिळवून देणारा नेमबाज अभिनव बिंद्राने आंतरराष्ट्रीय नेमबाजी फेडरेशनच्या खेळाडू समितीचा कार्याध्यक्ष म्हणून दिलेल्या सर्वोत्तम योगदानाबदल त्याचा नेमबाजीतील सर्वोच्च अशा ब्लू क्रॉस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार सोहळा जर्मनीत पार पडला.अभिनव बिंद्रा आयएसएसएफ व्दारा सर्वात प्रतिष्ठेचा ब्लू क्रॉस पुरस्काराने सन्मानित होणारा पहिला भारतीय ठरला आहे.

या पुरस्काराने सन्मानित झाल्यावर आपली प्रतक्रिया देताना अभिनव बिंद्राने सांगितले की, या खेळाप्रती आणि खेळाडूंप्रती माझ्या योगदानासाठी हा पुरस्कार देऊन माझा सन्मान केल्याने मी आयएसएसएफचा आभारी आहे. अभिनव बिंद्राने एक ऑलिम्पिक सुवर्णपदक (बीजिंग, 2008), जागतिक अजिँकपड स्पर्धा सुवर्णपदक( 2006), सात राष्ट्रकुल स्पर्धा पदके आणि तीन आशियाई पदके मिळवली आहेत.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)