भारतीय नेमबाज अभिनव बिंद्राला प्रतिष्ठेचा ‘ब्लू क्राॅस’ पुरस्कार

नवी दिल्ली – भारताचा अाॅलिंपिक आणि विश्वविजेता नेमबाज अभिनव बिंद्राने आंतरराष्ट्रीय नेमबाजी फेडरेशनच्या खेळाडू समितीचा कार्याध्यक्ष म्हणून दिलेल्या सर्वोत्तम योगदानाबदल त्याचा नेमबाजीतील सर्वोच्च अशा ब्लू क्राॅस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार सोहळा जर्मनीत पार पडला.

अभिनव बिंद्रा आयएसएसएफ व्दारा सर्वात प्रतिष्ठेचा ब्लू क्राॅस पुरस्काराने सन्मानित होणारा पहिला भारतीय ठरला आहे.

म्युनिकमध्ये आपल्याला नेमबाजीतील ब्लू क्राॅस या सर्वाेच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, त्याचा मला अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया अभिनव बिंद्रा याने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)