अबब… पुणे जिल्ह्यात टॅंकरची संख्या150 च्या घरात!

पुणे – जिल्ह्यातील पाणी टंचाईची तीव्रता दिवसेंन दिवस वाढत असल्यामुळे टॅंकरची संख्याही झपाट्याने वाढली आहे. बुधवार (दि. 24) पर्यंत जिल्ह्यात तब्बल 144 टॅंकरद्वारे 88 गावे 817 वाड्या-वस्त्यांवरील दोन लाख 62 हजार नागरिकांची तहान भागविली जात आहे. मागील चार दिवसात आंबेगाव तालुक्‍यात टॅंकरची संख्या झपाट्याने वाढली असून, जुन्नरमध्येही टॅंकर वाढले आहेत. दरम्यान पुढील आठ दिवसात टॅंकरची संख्या 150 वर जाण्याची शक्‍यता आहे.

पावसाळ्याला अजून सव्वा महिना आहे. तोह वेळेवर आला तर ? अन्यथा दुष्काळाची परिस्थिती भयानक रूप घेण्याची भिती आहे. एप्रिल महिन्यात टॅंकरची संख्या 150 वर गेली तर मे महिन्यात आणखीन 80 ते 100 ने टॅंकरची संख्या वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे मागील दहा वर्षातील टॅंकरच्या संख्येचे रेकॉर्ड यंदा मोडण्याची शक्‍यता आहे. मात्र, ही वाढती संख्या म्हणजे दुष्काळाचे भयान रूप असेल. त्यामुळे आहे त्या पाण्याचे योग्य नियोजन करणे प्रशासनासमोर मोठे आवाहन आहे. त्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करणे आवश्‍यक आहे. तरच या दुष्काळाला सामोरे जाता येईल. जिल्ह्यात सर्वाधिक टॅंकर बारामती तालुक्‍यात असून, 31 टॅंकरद्वारे 20 गावे आणि 273 वाड्या-वस्त्यांवरील 61 हजार 510 नागरिकांची तहान भागविली जात आहे. त्यानंतर शिरूर तालुक्‍याचा दुसरा क्रमांक लागत होता. परंतू, मागील पंधरा दिवसात आंबेगाव आणि पुरंदर तालुक्‍यात टॅंकरची संख्या झपाट्याने वाढली असून, तीनही तालुक्‍यात प्रत्येकी 21 टॅंकर सुरू आहेत.

मावळ आणि मुळशीमध्ये पाण्याची टंचाई नाही?
जिल्ह्यातील तेरा तालुक्‍यांपैकी दहा तालुक्‍यांमध्ये डिसेंबरपासूनच पाणी टंचाई भासू लागली. कालांतरणाने पाण्याचे साठी आटू लागल्यामुळे एप्रिल महिन्यात भोरमध्येही एक गाव आणि 4 वाड्या-वस्त्यांवरेल 550 नागरिकांसाठी एक टॅंकर सुरू करण्याची वेळ आली. परंतू मावळ आणि मुळशीमध्ये अत्तापर्यंत एकही टॅंकर सुरू झाला. खरच याठिकाणी असलेल्या डोंगराळ भागात, वाड्या-वस्त्यांवर पाण्याची टंचाई नाही का? नसेल तर ही उत्तम बाब आहे. तालुक्‍याने पाण्याचे योग्य नियोजन केल्यामुळे टॅंकर सुरू करण्याची वेळ आली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)