…आणि मॅच फिक्सिंग प्रकरण उघडकीस आले

File pic

कराची – मोहम्मद अमीर याने आमचा त्यावेळचा कर्णधार शाहीद आफ्रिदी याला मॅच फिक्‍सिंगची कबुली दिल्यानंतर आफ्रिदीने त्याच्या श्रीमुखात दिल्याचा आवाज माझ्या कानावर आला. त्यामुळेच अमीर याने पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला असे पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू अब्दुल रझाक याने सांगितले.

पाकिस्तानने 2010 मध्ये इंग्लंडचा दौरा केला होता. हा दौरा सुरू असताना अमीर, मोहम्मद असिफ्‌ व सलमान बट्ट यांनी मॅच फिक्‍सिंग केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे त्यांच्यावर इंग्लंडमधील पोलिसांकडून रीतसर कारवाई झाली होती. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनेही त्यांच्यावर पाच वर्षांकरिता निलंबनाची कारवाई केली होती.

या घटनेबाबत रझाक याने सांगितले की, अमीर याने या गुन्ह्याची कबुली करण्यास सुरूवात केली त्यावेळी आफ्रिदीसमवेत मी उपस्थित होतो. मात्र आफ्रिदीने मला खोलीबाहेर जाण्यास सांगितल्यानंतर खोलीबाहेर गेलो. त्यानंतर अमीर याला आफ्रिदीने जोराने थोबाडीत मारल्याचा आवाज माझ्या कानावर आला. पाठोपाठ अमीर याचे रडणेही माझ्यावर आले. मी अक्षरश: हादरून गेलो. त्यावेळी आमच्या क्रिकेट मंडळाने स्वत:हूनच या तीन खेळाडूंना त्वरेने मायदेशी पाठविण्याची आवश्‍यकता होती. तसे व करता त्यांनी या प्रकरणाची जबाबदारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाकडे सोपविले. त्यामुळे आमच्या क्रिकेट मंडळाची आणि देशाचीही नाचक्की झाली.

रझाक याने पुढे सांगितले की, अमीर, बट्ट व असिफ यांच्याबाबत मला संशय आला होता. मी तसे आफ्रिदी याला सूतोवाचही केले होते. मात्र त्याने माझे म्हणणे फारसे गांभीर्याने घेतले नसावे. आफ्रिदीने वेळीच लक्ष दिले असते तर कदाचित हे प्रकरणच घडले नसते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)