“एबीसीडी-3’मध्ये नोरा फतेहीची वर्णी?

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला रेमो डिसुझा दिग्दर्शित “एबीसीडी-3′ हा चित्रपट येणार आहे. श्रद्धा कपूर आणि वरूण धवन हे पुन्हा एकदा या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. त्यातच कतरिना कैफ बाहेर पडल्यानंतर तिच्या जागी नोरा फतेही हिची वर्णी लागणार आहे. यात ती देखील मुख्य भूमिका साकारणार असल्याचे वृत्त आहे. यामुळे चित्रपटात वरूण, श्रद्धा आणि नोरा असा ट्रॉंगल पाहण्यास मिळेल.

“सत्यमेव जयते’ चित्रपटातून नोरा फतेहीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ती या चित्रपटातील “दिलबर’ गाण्याच्या रिमेकमध्ये झळकली होती. प्रेक्षकांमध्ये हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले होते. या गाण्यात नोराने बेली डान्स केला होता. तिच्या चाहत्यांमध्ये तिच्या अदांची भूरळ प्रचंड मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली. ती आता “एबीसीडी-3′ मध्ये दिसणार असल्याने पुन्हा एकदा तिचा डान्स प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“एबीसीडी’ चित्रपटाची सिरीज ही डान्सवर आधारित आहे. आता तिसरा भाग हा देखील डान्सवरच आधारित आहे. यापूर्वी दुस-या सिरीजमध्ये वरूण आणि श्रद्धाची जोडी झळकली होती. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला 22 जानेवारीपासून पंजाबमध्ये सुरुवात होणार आहे. तर या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार करणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)