‘ABCD-3’मधून शक्ति मोहनचे पदार्पण 

डायरेक्‍टर-कोरियोग्राफर रेमो डिसूझा याच्या डान्स फ्रेंजाइजी असलेल्या एबीसीडीच्या तिस-या भागात डान्सर शक्‍ति मोहन झळकणार आहे. या चित्रपटातून अभिनेत्री म्हणून शक्‍ति बॉलीवूडमध्ये पर्दापण करत आहे. डान्स रिऍलिटी शो “डान्स प्लस 4’च्या शो दरम्यान रेमोने शक्‍तिला चित्रपटाची ऑफर दिली होती.

विशेष, म्हणजे डीआयडी-2ची विजेता ठरलेली असतानाही शक्‍तिला संधी देण्यात आली नव्हती. आता वरुण धवन आणि कतरिना कैफ यांची मुख्य भूमिका असलेल्या “एबीसीडी-3’मध्ये शक्‍तिला मिळालेली संधीतून मोठा ब्रेक मिळणार आहे.

याबाबत शक्‍ति म्हणाली, मी अनेक दिवसांपासून अशा संधीच्या शोधात होते. ती संधी मिळाल्याने मी खूप उत्साहित आहे. रेमो सरांसोबत प्रत्येकवेळी काम करताना खूप चांगले वाटते. त्यात आता त्यांच्यासोबत चित्रपटात काम करणे खूपच रोमांचक ठरणार आहे. या चित्रपटातून मी डेब्यू करणार असल्याने मी आतापासूनच शूटिंग कधी सुरू होणार याची वाट पाहत आहे, असे शक्‍तिने सांगितले.

दरम्यान, शक्‍ति मोहन हिने “तीस मार खान’ आणि “रावडी राठोड’ चित्रपटात आयटम सॉंग केलेले आहे. तसेच टिव्ही शो “दिल, दोस्ती, डान्स’मध्येही झळकलेली आहे. तसेच रेमोने शक्‍तिशिवाय डान्स प्लस-4मधील वर्तिका झा हिलाही चित्रपटासाठी ऑफर दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
7 :thumbsup:
15 :heart:
16 :joy:
6 :heart_eyes:
5 :blush:
1 :cry:
2 :rage:

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)