#अौषध_बगीचा : झेंडू

-सुजाता गानू

झेंडूची गेंडेदार पिवळी, केशरी फुले दसरा दिवाळीच्या सणात प्रत्येकाच्या घरी माळांनी सजलेली असतात. त्याचा एक प्रकारचा सुगंध असतो. याला कोकणात मखमल असे म्हणतात. ही मखमल पदार्थावर सजावट करण्यासाठीसुद्धा वापरतात.

रक्‍त मुळव्याधीवर उपयोगी – हे मूळव्याधीवर विशेषकरून रक्‍त पडणाऱ्या मूळव्याधीवर फार चांगले गुणकारी आहे. ह्याचा पोटात घेण्यास व वरून बांधण्यास असा दुहेरी उपयोग करतात. झेंडूच्या नुसत्या पाकळ्या काढून त्या वाटून त्याचा रस काढावा. तो रस अंदाजे 10 मि. ली. त्यात 30 ग्रॅम चांगले तूप घालून दिवसातून दोन वेळ सांजसकाळ घ्यावा. दोन तीन दिवसात परिणाम होतो. मूळव्याधीतून रक्‍त पडण्याचे थांबते. मूळव्याधीची जागा सुजून ठणका लागला तेव्हा झेंडूची
फुले चांगली नीट वाटून त्यात तूप, हळद घालून ऊन करावे; चांगले ऊन झाल्यावर ते पोटीस मूळव्याधीवर बांधावे. ठणका थांबतो व मूळव्याध बरी होते.

-Ads-

जखमेवर – झेंडूची फुले वाटून त्यात तूप, हळद घालून कोमट करावे. सहन होईल इतपत कोमट झाल्यावर ते पोटीस जखमेवर बांधावे. जखमेचा ठणका लगेच थांबतो. दोन दिवसांत जखम सुकून बरी होते. अशाप्रकारे झेंडूची फुले औषधी आहेत. म्हणूनच त्यांना हिंदू सणांमध्ये अग्रगण्य स्थान आहे.

दात ठणकत असेल तर – झेंडूची पाने व फुले एकत्र वाटून त्याची गोळी दाताखाली धरावी.

सूज आणि मुका मारावर – सूज आली असता तसेच मुक्‍कामारावर झेंडूची पाने स्वच्छ धुवून वाटून त्याचे पोटीस बांधावे. लेप किंचित गरम करून लावावा. सूज उतरण्यास मदत होते. अशाप्रकारे झेंडूचे अनेक औषधी उपयोग आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)