आरती सेहवागची बनावट सहीद्वारे साडेचार कोटींची फसवणूक

मुंबई : भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याच्या पत्नीची बनावट सहीच्या आधारे कोट्यवधींची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. वीरेंद्रची पत्नी आरती सेहवागने आर्थिक गुन्हे शाखेकडे या फसवणूकीबाबत तक्रार दाखल केली आहे.

आरती सेहवाग यांची दिल्लीत राहणाऱ्या रोहित कक्‍कड नावाच्या व्यक्‍तीने ही फसवणूक केली आहे. या दोघांनी मिळून दिल्लीत पार्टनरशिपमध्ये एक व्यवसाय सुरू करण्यात आला होता. दरम्यान या व्यक्‍तीने आपले नाव आणि बनावट सहिच्या आधारे साडे चार कोटींची कर्ज घेतल्याचा आरोप आरतीने केला आहे. रोहित आणि त्याच्या काही मित्रांनी मिळून एका फर्मसोबत संपर्क साधला तसेच रोहित आणि आरती एकत्र काम करत असल्याचे दाखवून त्या फर्मकडून साडे चार कोटींचे कर्ज घेतल्याचे आरतीने म्हटले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)