कारली खा; निरोगी व्हा…(भाग 1)

वीस-पंचवीस वर्षांच्या मागे कार्ले खाणारी महाराष्ट्रात फार थोडी माणसे भेटत. उत्तरेत, विशेषत: दिल्ली, राजस्थान, कानपूर या ठिकाणी पंजाबी डिशमध्ये मात्र आवर्जून “करेला’ भाजी लोक आवडीने खाताना दिसायचे. गेल्या पंचवीस वर्षात आपल्यात खूप “सुधारणा’ झाली असे लोक म्हणतात. समृद्धी, पैसा, आराम आला. त्याबरोबर त्याचे रोगही आले.

सर्व रोगांचा या जगातील राजा म्हणजे मधुमेह. त्याचा प्रचार, प्रसार जसा वाढतोय तसतसे कार्ले या भाजीचा महिमा, मागणी, किंमत वापर वाढत चाललाय.

कार्ले फळ, पाने, फळाची पावडर, रस अशा विविध स्वरुपांत वापरले जाते. कार्ले खूप कडू आहे. तशा अनेक भाज्या कडू आहेत. पण संतर्पणोत्थ व्याधी म्हणजे जास्त खाऊन पिऊन उत्पन्न झालेल्या रोगांवर कार्लेसारखी रोज खाऊ शकू, अशी भाजी नाही. कडू रसाचे पदार्थ स्वत:ची चव खराब असली तरी अरुची, कृमी, विषविकार, खूप तहान लागणे इत्यादी कफ विकारांत उत्तम काम देतात.

-Ads-

कार्ले बहुमूत्रप्रवृत्ती, थकवा, ग्लानी, कृमी, जंत, मोठे जंत, कृमींमध्ये सर्दी, खोकला, खाज, त्वचा रोग, पित्ताची जळजळ, मंदपणा, तोंडाला पाणी सुटणे, तोंडात सतत गोड चव राहणे, डोळे जड होणे, जीभ पांढरी होणे, जखमा चिघळणे, जखमातून पूं वाहणे, यकृत-प्लीहा वृद्धी, विषमज्वर, पांडू, अजीर्ण, शेथ, पित्तप्रकोप, आमवात इत्यादी विविध तीनही दोषांच्या तक्रारीत काम करते. मधुमेह, मधुमेही जखमा, स्थौल्य व स्तनांचे विकार यावरती कार्ले विशेष प्रभावी कार्य करते. औषध म्हणून कार्ल्याची निवड मात्र चांगली असावी. सरळ आकाराची, फार जून नाही अशी कार्ली उपयोगी आहेत. लहान बालकांच्या मधुमेहात शक्‍यतो कार्ले हे फळ वापरू नये.

कार्ल्याच्या पानांत रस विषमज्वर व यकृत प्लीहावृद्धीमध्ये परिणामकारक उपशम देतो. विषमज्वर किंवा टाइफाईड हा खराब पाणी व त्यातील जंतुंमुळे उद्‌भवणारा विकार आहे. अन्नवह महास्रोतसांत हे जंतू पुन:पुन्हा ज्वर उत्पन्न करतात. ताप नॉर्मलला येऊ देत नाहीत. त्याकरिता कार्ल्यांच्या पानांचा रस प्यावा. यकृत प्लीहा वाढलेली असताना अग्निचे बल कमी पडते. रक्तातील श्‍वेत कण वाढतात. अशा वेळी कार्ल्याच्या पानांचा रस यकृत व प्लीहेच्या उत्तेजनाचे काम करतो. त्यामुळे नवीन जोमाने रक्त बनू लागते.

बालकाचा कफ ही एक समस्या असते. त्यांना ओकारी सहजपणे झाली तर बरे वाटते. त्याकरिता कार्ल्याच्या पानांचा चमचा दोन चमचे रस उत्तम काम देतो. लहान बालकांचा डबा, यकृत-प्लीहा शोथ, हातापायाच्या काड्या या विकारांत पानांचा रस फार प्रभावी उपाय आहे. बालकांचे पोट साफ होते. मुले वाढीला लागतात. मधुमेहात तळपायाची आग होते. त्याकरिता कार्ले पानाचा रस प्यावा. रातांधळे विकारात डोळ्यावर बाहेरून कार्ले पानांचा रस व मिरपूड असा लेप लावावा.

कारली खा; निरोगी व्हा…(भाग 2)

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)