वयात येताना सांभाळा (भाग 2)

वयात येताना सांभाळा (भाग 1)

-मानसी चांदोरीकर

शेफालीला घेऊन तिची आई भेटायला आली. आल्यावर आईने शेफालीची आणि स्वतःची ओळख करून दिली. शेफाली नुकतीच नववीमध्ये गेली होती आणि तिची आई गृहिणी होती. शेफाली ही त्यांची एकुलती एक मुलगी. त्यामुळे जरा लाडावलेली होती. त्यांनी ओळख करून दिल्यावर तिला बाहेर थांबवण्याची परवानगी मागितली आणि तिला बाहेर नेऊन बसवले.

-Ads-

पण ओळख झाल्यावर आणि विश्‍वास संपादन झाल्यावर ती हळूहळू बोलायला लागली. ती मोकळी झाल्यावर म्हणजे मोकळेपणाने बोलू लागल्यावर या वयात आपल्यात कोणकोणते शारीरिक, मानसिक, भावनिक बदल होतात? ते का होतात? त्यांचे अर्थ काय? या साऱ्यांबाबत तिला पुढील सत्रांमध्ये सविस्तर व शास्त्रीय माहिती दिली.

तिच्या मनातल्या अनेक शंका तिनेही मोकळेपणाने विचारल्या. आपल्या वागण्यात झालेल्या बदलांमागची शास्त्रीय कारणे लक्षात आल्याने आपले हे वर्तन कमी करण्यासाठी काय करायचे? याबाबतही ती खूपच मोकळेपणाने बोलली त्यापद्धतीचे प्रयत्नही तिने केले. तिच्या आईच्या सांगण्याप्रमाणेच तिचा मूळचा स्वभाव समजूतदार होता; परंतु कौटुंबिक वातावरणात तिला मिळणाऱ्या वागणुकीमुळे ती अशी चिडकी, हट्टी झाली होती. होत असणाऱ्या अतिरिक्त लाडांमुळे तिचा हा मूळ स्वभाव बदलला होता हे लक्षात आल्यावर तिच्या आईला सांगून घरातल्या सदस्यांबरोबर सत्र घेतले.

या सत्रात तिचे आजोबा, काका-काकू, वडील व आई आले होते. त्यांच्याशी संवाद साधून आधी विश्‍वास संपादनाचे कार्य पूर्ण झाल्यावर त्यानंतर त्यांना शेफालीची समस्या समजावून सांगितले व तिचे हे वर्तन कमी करण्यासाठी आपण काय काय प्रयत्न करणे आवश्‍यक आहे व का? ते त्यांना विविध उदाहरणे देऊन समजावून सांगितले.

तिच्या या वर्तनात बदल न झाल्यास पुढे काय समस्या निर्माण होऊ शकतील. तिचे सध्याचे वर्तन कसे हाताळायचे याबाबत सविस्तर चर्चा केली. सुरुवातीला तिच्या आजोबांना ही गोष्ट मान्य नव्हती. परंतु सत्रातील एकूण चर्चेनंतर त्यांना याचे गांभीर्य लक्षात आले व त्यांनी बदलाची तयारी दर्शवली. त्यामुळे आईची चिंता कमी झाली.

काही दिवसांनी शेफालीच्या केसचा मागोवा घेतल्यावर तिच्या बऱ्याचशा समस्या (वार्तनिक) कमी झाल्याचे तिच्या आईने समाधानाने सांगितले.

What is your reaction?
81 :thumbsup:
46 :heart:
2 :joy:
10 :heart_eyes:
17 :blush:
6 :cry:
4 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)