कारली खा; निरोगी व्हा…(भाग 2)

कारली खा; निरोगी व्हा…(भाग 1)

वीस-पंचवीस वर्षांच्या मागे कार्ले खाणारी महाराष्ट्रात फार थोडी माणसे भेटत. उत्तरेत, विशेषत: दिल्ली, राजस्थान, कानपूर या ठिकाणी पंजाबी डिशमध्ये मात्र आवर्जून “करेला’ भाजी लोक आवडीने खाताना दिसायचे. गेल्या पंचवीस वर्षात आपल्यात खूप “सुधारणा’ झाली असे लोक म्हणतात. समृद्धी, पैसा, आराम आला. त्याबरोबर त्याचे रोगही आले.

मधुमेहाकरिता कार्ले रस, पावडर, भाजी यांचा सर्रास प्रचार चालू आहे. इथे थोड्या तारतम्याची गरज आहे. ताज्या कार्ल्याचा रस फार प्रभावी आहे.

-Ads-

तरुण, बलवान, भरपूर रक्तर्शकरा वाढलेल्या मधुमेही रुग्णाला पहिले चार-आठ दिवस कार्ल्याचा पाव अर्धा कप रसाने बरे वाटते. त्यानंतर पुन्हा आठ दिवसांनी रक्तशर्करा तपासावी. ती खूप कमी असेल तर मग कार्ले रसाचे प्रमाण कमी करावे. त्याऐवजी अधूनमधून कार्ले भाजी, कार्ले चूर्ण असा वापर करावा.

कार्ल्याचा रस घेऊन ज्यांना गरगरू लागते त्यांनी रस घेणे लगेच थांबवावे. अर्धा चमचा साखर किंवा खडीसाखरेचा खडा खावा. वृद्ध रुग्णांनी, साठ वर्षांच्या वरच्या मधुमेहींनी कार्ल्याच्या फळाचे सावलीत वाळवून केलेल्या चूर्णाचा वापर करावा. त्याचे प्रमाण कमी जास्त करता येते. लघवीला वास येणे जोपर्यंत आहे; लघवी गढूळ आहे. तोपर्यंत कार्ले चूर्ण नियमित घ्यावे. लघवीचा वर्ण निवळला की प्रमाण कमी करावे.

रक्तातील साखरेचे नियंत्रण झाल्यावर कार्ल्याचे लोणचे, कमी गूळ घालून पंचामृत कार्ल्याचा कडूपणा कमी करून तयार केलेली भाजी असा वापर चालू ठेवावा. पित्तविकार, सांधेदुखी, मधुमेहात वजन घटणे या तक्रारी असणारांनी कार्ले खाऊ नये, पंजाबी ढंगाची भरपूर तेल, डालडा असलेली कार्ल्याची भाजी काहीच गुण देणार नाही.

What is your reaction?
2 :thumbsup:
2 :heart:
2 :joy:
2 :heart_eyes:
2 :blush:
4 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)