कार्यक्षीण हृदय (भाग 2)

-डाॅ. बिपीनचंद्र भामरे

कार्यक्षीण हृदय (भाग 1)

सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर हृदय हे शरीराचा मोटर पंप असते. हृदय कार्यक्षीणता म्हणजे हृदयातील स्नायू शरीराच्या गरजेनुसार आवश्‍यक तेवढे रक्त पंप करू शकत नाहीत. हृदय कार्यक्षीण होण्याचे अनेक प्रकार असतात. यासाठी सर्वप्रथम आपल्याला हृदयाची रचना समजून घ्यावी लागेल.

-Ads-

उपचार : मी वर नमूद केल्याप्रमाणे हृदय कार्यक्षीणतेच्या बहुतेक कारणांवर उपचार करता येऊ शकतात. त्यांच्यापैकी काही बरे केले जाऊ शकतात, तर काही लक्षणे बरी करता येऊ शकत नाहीत. पण, औषधांच्या माध्यमांतून त्यावर नियंत्रण ठेवता येऊ शकते. काही लक्षणे मात्र, औषधांनी नियंत्रित करता येत नाहीत.

कमाल प्रमाणात औषधे घेऊनही हदय कार्यक्षीणतेची परिस्थिती बिकट होत जाते आणि तुम्हाला अनेकदा हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागू शकते. हृदय कार्यक्षीणतेच्या लक्षणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही रुग्णांना वर्षातून दोन-तीन वेळा हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागू शकते.

आता आम्ही या रुग्णांना एक आशेचा किरण दाखवू शकतो. गेल्या दोन दशकांमध्ये हृदय कार्यक्षीणतेवरील उपचारांमध्ये खूप सुधारणा झाली आहे. हृदय कार्यक्षीणतेसाठी कारणीभूत असणाऱ्या घटकांनुसार या उपचारांची आखणी करण्यात आली आहे. शस्त्रक्रिया करून तुमच्या हृदयाच्या डाव्या कप्प्यांची सूज कमी करून त्यावर उपचार करू शकतो, तुमच्या हृदयाच्या झडपांवर उपचार करू शकतो.

हृदय प्रत्यारोपण ही एक क्रांतिकारक सुधारणा घडून आली आहे. या शस्त्रक्रियेमुळे तब्बल 10 वर्षांपर्यंत परिणाम पाहायला मिळतात. हृदय कार्यक्षीणतेवर उपचार करण्यासाठी लहान आकाराचे मोटर पंपसुद्धा उपलब्ध आहेत. या पंपांना एलवॅड्‌स (लेफ्ट व्हेन्ट्रिक्‍युलर असिस्ट डिव्हाइसेस) म्हणतात.

हे अत्यंत लहान आकाराचे मोटर पंप हृदयाच्या डाव्या बाजूला असतात आणि रक्ताभिसरण सुरू ठेवतात. ही अत्यंत उत्साहाची बाब आहे आणि गेल्या दशकात उत्तर अमेरिकेतील अनेक केंद्रांनी परिणामांमध्ये सुधारणा झाल्याची नोंद केली आहे. जेव्हा मी उत्तर अमेरिकेत होतो, आम्ही दर आठवड्याला अशा प्रकारची 3 ते 4 यंत्रे बसवायचो. ही उपकरणे उत्कृष्ट काम करतात आणि जेव्हा औषधांचा परिणाम होईनासा होतो, तेव्हा या उपकरणांमुळे आयुर्मान वाढण्यास मदत होते.

हृदय कार्यक्षीणता या आजाराचे आयुष्यभर व्यवस्थापन करावे लागते. आधुनिक तंत्रज्ञानाने हृदय कार्यक्षीणतेसाठी अनेक नवी व्यवस्थापन उपकरणे उपलब्ध करून दिली आहेत. उपचारांनंतर हृदय कार्यक्षीणतेच्या लक्षणांमध्ये सुधारणा होऊ शकते आणि हृदय सशक्त होते. उपचारांमुळे तुमचे आयुर्मान वाढते आणि अचानक मृत्यू होण्याची शक्‍यता कमी होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)