कोरड्या केसांची काळजी (भाग २)

-डाॅ.शितल जोशी

थंडी पडायला लागली की केस कोरडे होणे, गळणे, चाई पडणे, तसंच त्वचेवर ओरखडे उमटणे, त्वचा काळवंडणे, पापुद्रे सुटणे, भेगा पडणे असे विकार व्हायला सुरुवात होते. या विकारांकडे दुर्लक्ष झालं तर ते गंभीर स्वरूप धारण करू शकतात. टक्‍कल पडू शकतं किंवा त्वचा निस्तेज दिसायला लागते. म्हणूनच या दिवसांत केसांची आणि त्वचेची काळजी घेणं आवश्‍यक आहे. कशी हे पाहू या.

ऑलिव्ह ऑईल- ऑलिव्ह ऑईल गरम करून टाळूवर मसाज करा. एक-दोन तास तसंच ठेवा. त्यानंतर केस धुवा. असं केल्याने केसांच्या मुळांना पोषण मिळतं आणि केस मजबूत होतात.

बदाम तेल- बदामात नैसर्गिकरीत्याच डी आणि ई जीवनसत्त्व असतं जे तुमच्या केसांना नैसर्गिकपणे मॉइश्चर देतं. आणि कोरडे किंवा खराब होण्यापासून त्यांचा बचाव करते. म्हणूनच केस धुण्याच्या आदल्या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी बदामाच्या तेलाने केसांना मसाज केला तर तुमचे केस मजबूत होतात.

खोबरेल तेल- खोबरेल तेल घेऊन त्याने केसांच्या मुळाशी बोटांच्या साहाय्याने मसाज करा. यामुळे खराब झालेले केस किंवा दुभंगलेले केस व्यवस्थित करण्यास मदत करतात. तेल गरम करून टाळूवर लावल्यावर तिथलं रक्‍ताभिसरण सुरळीत होतं आणि केसांना आवश्‍यक असलेला ऑक्‍सिजन त्यातून मिळतो.

एरंड तेल- आपल्याला माहीत नसतं मात्र एरंड तेल असं तेल आहे जे तुमच्या केसांच्या प्रत्येक समस्येवरील रामबाण उपाय आहे. दररोज केसांच्या मुळाशी लावल्याने रक्‍ताभिसरण सुरळीत होतं आणि नैसर्गिकरित्या केसांना ऑक्‍सिजन पुरवला जातो. परिणामी केस वाढतात. त्यात जीवनसत्त्व ई आणि ओमेगा 6 नावाचं ऍसिड असल्याने केसांना त्यामुळे मॉइश्चर मिळतं. आणि दुभंगण्यापासून बचाव होतो.

कोरफड आणि खोबरेल तेल- कोरफडीत अँटीबॅक्‍टिरिअल आणि अँटीफंगलचे गुण असतात. ज्यामुळे कोंड्यापासून बचाव होण्यास मदत होते. म्हणूनच कोरफडीचं गर खोबरेल तेलात घालून ठेवावा. असं हे मिक्‍स केलेलं तेल टाळूला लावून ठेवावं. अर्ध्या तासानंतर धुऊन टाकावं. म्हणजे चाईचा त्रास होत नाही आणि रक्‍ताभिसरणही सुरळीत होतं. आवळा आणि खोबरेल तेल- अवळा हे केसांचं टॉनिक असून केसांच्या आरोग्यासाठी हे उत्तम आहे. आवळ्याची पूड खोबरेल तेलात घालून केसांच्या मुळांशी लावल्याने मुळं मजबूत होतात आणि केसांची वाढ होते. केसांत कोंडा होणे आणि अकाली केस पांढरे होण्यापासून बचाव होतो.

चला मग हे उपाय करून बघा आणि केसांची काळजी घ्या.

कोरड्या केसांची काळजी (भाग १)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)