दिल्लीत साखा टॅक्सीमध्ये केला आमिरने प्रवास

मुंबई – बॉलीवुड अभिनेता आमिर खान गेल्या काही दिवसांपासून आगामी चित्रपट “ठग्स ऑफ हिंदोस्तान” च्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आमिर खान आज दिल्ली येथे पोहचला आहे. दिल्लीमध्ये आमिर खानचा वेगळा अंदाज पाहायला मिळाला, अमीरने दिल्ली एयरपोर्टवरून हॉटेल जाण्यासाठी ‘साखा टॅक्सी’ च्या उपयोग केला.


दरम्यान, दिल्लीमध्ये साखा टॅक्सी मागच्या काही दिवसांपासून चालवण्यात येत आहे. ही टॅक्सी फक्त महिलाच चालवितात. आमिर खानने साखा टॅक्सीचा प्रवास सामान्य नागरिकांप्रमाणे केल्याने बॉलीवूडमध्ये त्यांच्या या अंदाजाची फार चर्चा होत आहे. तसेच “ठग्स ऑफ हिंदोस्तान” चित्रपट बघण्यासाठी त्याचे चाहते चीनवरून भारतात येणार असल्याचे देखील वृत्त आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)