आमिर खानचे चाहत्यांना स्पेशल बर्थडे “गिफ्ट’

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्‍शनिस्ट आमिर खान नुकताच आपला वाढदिवस साजरी केला. आपल्या जन्मदिनी नेहमीप्रमाणे आमिरने माध्यमांशी संवाद साधाला. यावेळी आमिरची पत्नी किरण रावही हजर होती. आमिरने केक कापून वाढदिवस साजरा केला. यावेळी आमिरने आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा करत चाहत्यांना स्पेशल बर्थडे “गिफ्ट’ दिले.

“लाल सिंह चड्‌ढा’ या चित्रपटात आमिर झळकणार आहे. हॉलिवूडच्या “फॉरेस्ट गंप’ या चित्रपटाचे हे अधिकृत ऍडप्शन असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वेत चंदन हे करणार आहेत. यापूर्वी “सिक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटाचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे. वाढदिवसानिमित्त्‌ आमिरने त्याच्या चाहत्यांना ही माहिती दिली.
“फॉरेस्ट गंप’ चित्रपटात हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता टॉम हॅक्‍सने मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटाला बेस्ट पिश्‍चरसाठी ऍकॅडमी पुरस्कारही मिळाला आहे.

याप्रसंगी सामाजिक भान जपत आगामी निवडणुकीत देशातील सर्व नागरिकांनी मतदान करावे, असे आवाहनही त्याने केले. वाढदिवसानिमित्त माझी इच्छा आहे की देशात होणाऱ्या आगामी निवडणुकीत माझ्या चाहत्यांनी मतदान करावे, असे आमिर खान म्हणाला.

दरम्यान, गतवर्षी आमिर खानचा “ठग्स ऑफ हिंदोस्तान’ चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर अपयशी ठरला होता. आमिर खान वर्षातून एकच चित्रपटात झळकतो. त्यामुळे मागील वर्ष आमिरसाठी अपयशी ठरले. मात्र त्याचा आगामी चित्रपट सुपरहिट ठरेल अशी आशा त्याच्या चाहत्यांना आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)