पुरस्कारामुळे जबाबदारी वाढते – आ.बच्चू कडू

स्नेहालयचा नानाजी देशमुख पुरस्कार मांजरसुंबा गावाला प्रदान

नगर  -प्रत्येकाने सेवा ही प्रामाणिकपणे केली पाहिजे. समाज आपल्याला डोक्‍यावर घेत असतो. पुरस्काराच्या ताकदीने पुढील चांगले काम करण्याचे धाडस निर्माण होते. समाजामध्ये मंदिराकडे जाण्याची गर्दी खूप वाढली आहे. परंतु तीच गर्दी उपेक्षित, वंचित, शोषितांकडे वळाली, तर प्रश्‍न सुटतील. राजकारणातून सुद्धा समाजकारण करता येते. अच्छे दिन आपल्यातून निर्माण करावे लागेल. शहर व ग्रामीण भाग पुढे येईल. पुरस्कार मिळाले की तुमची जबाबदारी अधिक वाढते, असे प्रतिपादन आ.बच्चु कडु यांनी मांजरसुंभा येथे केले.

-Ads-

स्नेहालयच्या वतीने गांधीवादी विलास शहा यांच्या प्रेरणेने नानाजी देशमुख पुरस्कार मांजरसुंब्याचे सरपंच जालिंदर कदम व गावकऱ्यांना निक कॉंक्‍स यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सादग्राम चळवळीचे हरिश बुटले होते. याप्रसंगी जॉयस कोनोली, आ. बच्चू कडू, सुवालाल शिंगवी, गिरीश कुलकर्णी, संजय गुगळे, राजीव गुजर, ग्रामसेवक सुरेश सौदागर, चंद्रभान कदम, विलास भुतकर, योगेश कदम, साहेबराव कदम, नामदेव कदम, संजय कदम, धोंडिभाऊ कदम, पप्पू कदम, दत्तू कदम, तुकाराम भोसले, तुकाराम कदम उपस्थित होते.

यावेळी स्नेहालयच्या वतीने इतर पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. डॉ. नरेंद्र दाभोळकर निर्भयता पुरस्कार विधीतज्ज्ञ रंजना गवांदे, संदीप वर्पे यांना, बाबा व साधना आमटे सेवा भूषण पुरस्कार सुहासिनी शहा व यतीन शहा यांना व जयप्रदा भांगे व योगेशकुमार भांगे यांना देण्यात आला, तसेच प्रा. ग. प्र. प्रधान पुरस्कर शांतीलाल मुथा यांना, मधुबेनजी गादिया पुरस्कार विधीतज्ज्ञ लता वाघ यांना, लता पवार जीवन गौरव पुरस्कार चांदबी महमंद शेख यांना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार अशोक गायकवाड, गोपालभाई गुजर सेक्‍हालय कार्यकर्ता पुरस्कार सेक्‍हालयच्या अनामप्रेम संस्थेतील कर्मचारी सुभाष शिंदे, बेबीताई केंगार यांना देण्यात आला, तसेच प्रा. मधू दंडवते संसदपटू पुरस्कार आ. बच्चू कडू यांना देण्यात आला.

सरपंच जालिंदर कदम म्हणाले की, गेली 15 वर्षे सातत्याने गावचा विकासाला चालना देण्याचे काम आपण केले. यामध्ये ग्रामस्थांचे चांगले सहकार्य लाभले. हे काम गावकर्यांच्या एकीमुळेच शक्‍य झाले. हा पुरस्कार आपणा सर्वांचा आहे. मांजरसुंबा गावाने आतापर्यंत विविध पुरस्कार मिळविले असून, या पुरस्कार इतर पुरस्कारांपेक्षा वेगळा आहे. सेक्‍हालय या सामाजिक क्षेत्रातील अग्रेसर संस्थेने आम्हाला पुरस्कार देऊन गौरविल्याने आमची मान अभिमानाने उंचावली आहे, असे सांगितले. सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी केले, तर आभार अजित माने यांनी मानले. चैतन्यच्या बासरीगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला. पुरस्कार मिळालेल्या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)