आम आदमी पक्ष नगर दक्षिणची जागा लढणार

अॅड. जावेद काझी, कमल सावंत, नीलेश शेलार यांच्या नावांची चर्चा

नगर – आम आदमी पक्ष नगर दक्षिण लोकसभेची जागा लढवणार आहे. लोकांना प्रामाणिक नेता आणि पक्ष हवा आहे. आम आदमी पक्षाची स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. दिल्लीत आप पक्षाने जी प्रामाणिक कामे केली आहेत त्यांची लोकांत हळूहळू जागरुकता वाढते आहे आणि लोक आम आदमी पक्षाशी जोडत आहेत. देशाला राजकीय उत्तम पर्याय म्हणून आम आदमी पक्ष आहे. त्यामुळे भविष्यातील सर्व निवडणूका लढवण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्ष नगर लोकसभा निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी प्रामुख्याने ग्रामीण भागावर लक्ष केंद्रीत करण्याचा “आप’ने ठरविले आहे. लवकरच उमेदवारांची नावे जाहीर होण्याची शक्‍यता आहे. सध्या आपकडून नगरच्या जागेसाठी ऍड. जावेद काझी, माजी सभापती महिला बालकल्याण कमल सावंत, माहिती अधिकार कार्यकर्ते नीलेश शेलार यांची नावे चर्चेत आहेत. त्यामुळे आपकडून कोणाला उमेदवारी मिळते आणि कोण प्रत्यक्ष निवडणूक लढण्यासाठी तयार होतं हे येत्या काळात स्पष्ट होईल.

गेल्या 2014 च्या लोकसभा निवडणुकीतही आपने महाराष्ट्रात उमेदवार उभे केले होते. अहमदनगर जिल्ह्यातून अभिनेत्री दीपाली सय्यद, जळगावमधून डॉ. संग्राम पाटील, रावेरमधून प्रतिभा शिंदे, पालघरमधून पांडुरंग पारधी, अकोल्यातून अजय हिंगलेकर, तर वर्धा मतदारसंघातून मोहम्मद अलीम पटेल यांना आपने मागील निवडणुकीत उमेदवारी दिली होती. याशिवाय ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनाही आपने मुंबईत भाजपच्या किरीट सोमय्यांविरोधात उमेदवारी दिली होती.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)