आलिया भटकडून ड्रायव्हर आणि हेल्परला घराची भेट 

बॉलिवूडचे कलाकार किती मोठ्या हृद्‌याचे असू शकतात, हे आपण स्क्रीनवर बघतो. पण प्रत्यक्ष्यातही काही कलाकार मोठ्या मनाचे असतात, अशी उदाहरणे आपल्याला सापडू शकतील. मुंबईसारख्या महानगरामध्ये स्वतःच्या मालकीचे घर खरेदी करणे म्हणजे किती अशक्‍यप्राय गोष्ट आहे, हे सर्वांनाच माहित आहे. आलिया भटने आपला ड्रायव्हर आणि हेल्परला 50-50 लाख किंमतीची घरे भेट म्हणून दिली आहेत. ड्रायव्हर सुनिल आणि हेल्पर अमोलला तिनी ही भेट दिली आहे. या दोघांशिवाय आपण राहूच शकत नाही, असे तिला वाटते.

या दोघांकडून वेळोवेळी झालेल्या मदतीबद्दल कृतज्ञता म्हणून आलियाने आपल्या 26 व्या वाढदिवसाला त्या दोघांना एक मोलाचे गिफ्ट देण्याचे निश्‍चित केले होते. त्यानुसार वाढदिवसाच्या काही दिवस आगोदर आलियाने या दोघांना 50 लाख रुपयांचे चेक दिले. त्यांनी मुंबईमध्ये घर खरेदी करावे, म्हणून तिने हे चेक दिले होते. एवढे कोण कोणासाठी करते आहे. जरी करणाऱ्या कलाकारांची नावे समोर असतील. पण आलियाने ज्या वयामध्ये हे दातृत्व दाखवले आहे, त्याला तोड नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)