पवना नदीत बुडालेला तरुण अद्यापही बेपत्ता

बुधवारी अंडर वॉटर तर ड्रोन कॅमेऱ्याचाही केला गुरुवारी वापर

पिंपरी – पिंपळे गुरव येथे पवना नदीपात्रात बुडालेल्या तरुणाचा सलग तिसऱ्या दिवशीही शोध लागू शकला नाही. दापोडी स्मशानभूमी ते हॅरीस ब्रिज या अंतरात त्यासाठी आज दिवसभर अग्निशामक दलाच्या वतीने शोध मोहीम राबविण्यात आली. त्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करण्यात आला. उल्लेखनीय आहे की, बुधवारी अग्निशामक दलाने पाण्यात खोलवर जाणाऱ्या “व्हिक्‍टीम लोकेशन कॅमेऱ्या’चा वापर करुन खाली पाण्यात शोध घेण्याचा प्रयत्न केला होता.

पिंपळे गुरव येथील घाटावरून मंगळवारी (दि. 9) दुपारी साडेचारच्या सुमारास शुभम येडे (वय – 23, रा. रहाटणी) या तरुणाने पवना नदीपात्रात उडी मारली होती. महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या पथकाने त्याचा मंगळवारी आणि बुधवारी शोध घेतला होता. ओबियम बोट आणि पाण्यात सोडण्यात येणाऱ्या “व्हिक्‍टीम लोकेशन कॅमेऱ्या’च्या सहाय्याने अत्याधुनिक पद्धतीने त्याचा शोध घेण्यात आला. तर, आज संबंधित तरुणाचा ड्रोन कॅमेरा वापरून तसेच बोटीच्या साहाय्याने शोध घेण्यात आला.

अग्निशामक दलाच्या 15 जवानांच्या पथकाने ही मोहीम राबविली. दापोडी येथे जलपर्णीच्या खाली तरुण गेल्याचा अंदाज होता. अग्निशामक दलाचे अधिकारी किरण गावडे, आपत्ती व्यवस्थापनचे ओमप्रकाश बहिवाल हे प्रत्यक्ष घटनास्थळी हजर होते. सकाळी 9:15 वाजता सुरू झालेली ही शोध मोहीम सायंकाळी 6:30 पर्यंत सुरू होती. मात्र, तो तरुण सापडू शकला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)