#IPL2019 : हरभजनच्या नावेही अनोखा विक्रम

चेन्नई सुपर किंग्जचा अनुभवी फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने सलामीच्या सामन्यात अनोखा विक्रम आपल्या नावावर केला असून आयपीएलच्या इतिहासात स्वतःच्याच गोलंदाजीवर अधिक झेल घेण्याचा विक्रम हरभजनने केला आहे. डावातल्या सहाव्या षटकादरम्यान दुसऱ्या चेंडुवर स्वतःच्या गोलंदाजीवर मोईन अलीला झेलबाद करत हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

हरभजनने आपल्याच संघातील सहकारी ड्‌वेन ब्रावोला पिछाडत स्वतःच्याच गोलंदाजीवर अधिक झेल घेण्याचा विक्रमाच्या यादीत अव्वल स्थान मिळवले. ब्रावोने आत्तापर्यंत स्वतःच्या गोलंदाजीवर 10 झेलबाद घेतले आहेत. हरभजननंतर तीन कॅरेबियन खेळाडू या स्पेशल क्‍लबचे हिस्सा आहेत. ज्यात हरभजन सिंह 11, ड्‌वेन ब्रावो 10, सुनील नारायन 7, कायरन पोलार्ड 6 हे खेळाडू अनुक्रमे एक ते चार क्रमांकामधे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)