नवसंकल्प एक्‍झिबिशनमध्ये करिअरच्या क्षेत्रांची परिपूर्ण माहिती

वाई- आधुनिक तंत्रज्ञाच्या युगात नोकरी, व्यवसायातील स्पर्धा जागतिक स्वरूपाची झाली आहे. स्पर्धकाच्या अंगी असाव्या लागणाऱ्या गुणांचे निकष जागतिक दर्जांचे असणे गरजेचे आहे. नोकरी, व्यवसायाच्या सर्व क्षेत्रे तंत्रज्ञानयुक्त झाल्याने नोकरी किंवा व्यवसायाची कोणतीही संधी मिळवावयाची असल्यास आपल्या अंगी कौशल्य शिक्षण असणे गरजेचे आहे.

यासाठी दहावी, बारावी, पदवी शिक्षणानतंर शेकडो करिअर कोर्सेसचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. यांची योग्य वेळी माहिती विद्यार्थ्यांना मिळणे गरजे आहे. नवसंकल्प एज्युकेशनल एक्‍झिबिशनमध्ये विद्यार्थ्यांना करिअरच्या सर्व क्षेत्रातील परिपुर्ण माहिती मिळण्यास मदत होईल असे मत एक्‍झिबिशनच्या उद्‌घाटन प्रसंगी वाई पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी कमलाकांत म्हेत्रे यांनी काढले.

यावेळी दिशा ऍकॅडमीचे संचालक डॉ. नितिन कदम, कलासागर ऍकॅडमीचे संचालक प्रा. लहूराज पांढरे, प्रा. हेमंत काळोखे, उत्कर्ष पतसंस्थेच्या अध्यक्षा अनुराधा कोल्हापुरे, अविनाश फरांदे, धनंजय मलटणे, रामदास राऊत, डॉ. सुनिल देशपांडे, अरूण अदलिगें, प्रशांत नागपुरकर, सी. डी. सपकाळ, दत्तात्रय मर्ढेकर, भद्रेश भाटे, पी. एस. भिलारे, सतिश जेबले, धनंजय घोडके, विनोद शिंगटे इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती. प्रथम सर्व मान्यवरांच्या हस्ते एक्‍झिबिशनचे उद्‌घाटन करण्यात आले. त्यानंतर सर्व शैक्षणिक स्टॉलची पाहणी करण्यात आली.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले विचार प्रकरट करून हे एक्‍झिबिशन हे दहावी, बारावी, पदवीधर विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक असून जास्तीतजास्त विद्यार्थ्यांनी भेट देवून अनेक करिअरच्या अभ्यासक्रमांची माहिती घ्यावी, असे अवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक पी. एस. भिलारे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सुनिल देशपांडे यांनी तर आभार सतिश जेबले यांना मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)