काश्‍मीरमध्ये एक दहशतवादी ठार; आणखी एकाला अटक 

श्रीनगर – जम्मू-काश्‍मीरमध्ये सुरक्षा दलांनी धडक मोहीम चालूच ठेवताना आणखी एका दहशतवाद्याचा खातमा केला. ही घटना गुरूवारी रात्री कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडा परिसरात घडली. दहशतवाद्यांच्या अस्त्विाची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा जवानांनी हंदवाडामध्ये त्यांच्या शोधासाठी मोहीम हाती घेतली.

त्या मोहिमेवेळी जवान आणि दहशतवादी आमनेसामने येऊन त्यांच्यात चकमक झडली. त्यामध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्याची ओळख तातडीने पटू शकली नाही. दरम्यान, कुपवाडा जिल्ह्यातील दुसऱ्या घटनेत शुक्रवारी सुरक्षा जवानांनी एका दहशतवाद्याला अटक केली. सज्जाद अहमद दर असे त्याचे नाव आहे. तो अल्‌-बद्र या दहशतवादी संघटनेचा सदस्य आहे. मागील काही दिवसांत सुरक्षा दलांनी धडक मोहिमा हाती घेताना काश्‍मीरमध्ये अनेक दहशतवाद्यांचा खातमा केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)