समृद्ध भारताचे स्वप्न साकारणारा विद्यार्थी प्रत्येक घरात

खटाव  – समृद्ध भारताची स्वप्न साकारणारा विद्यार्थी प्रत्येक घरात आहे, त्याला प्रेमाने, आधार व आश्रय देण्याची खरी गरज शाळेबरोबरच समाजाची असल्याचे मत, ग्रामीण साहित्यिक रमेश भोसले यांनी व्यक्त केले. जायगांव (ता. खटाव) येथील यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन कार्यक्रमाप्रसंगी प्रा. भोसले बोलत होते. विद्यार्थ्याला घडविण्यासाठी शाळेइतकाच समाजाचा आधार मोठा आहे. आता शिक्षणामुळेच नोकरी, भाकरी व छोकरी असे नवे सूत्र उदयास आले असल्याचे स्पष्ट करुन प्रा. भोसले म्हणाले, सोशल मीडियाचा सदुपयोग करीत आपले मन आणि विचार खंबीर ठेवल्यास ध्येय प्राप्ती निश्‍चित होईल, असा विश्‍वास व्यक्त करीत भोसले म्हणाले, स्वत:ला सिद्ध करण्याची एकही संधी सोडू नका, आपोआपच स्पर्धेच्या युगात तुम्ही अग्रणीय ठरत असल्याचे सांगितले. अध्यक्षस्थानावरुन बोलताना नवशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आर. के. देशमुख म्हणाले, विद्यालयाची उज्वल निकालाची परंपरा कायम ठेवून सलग सातव्या वर्षी 100 टक्के निकालासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले.

स्वागत मुख्याध्यापक अशोक देशमुख व प्रास्ताविक खजिनदार प्रभाकर देशमुख यांनी केले. एस. जे. रामुगडे यांनी सूत्रसंचालन तर आभार एस. आर. जगदाळे यांनी मानले. अनिल भंडारे व विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या सुनंदा राऊत, सरपंच देशमुख, उपाधयक्ष छगन यादव, माजी सरपंच किसन देशमुख, मारुती शिंदे, अंकुश देशमुख, विलास गोसावी, चांगदेव देशमुख, शंकर देशमुख, आदींसह शिक्षक, पालक, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)