चिखलीच्या धनगर वस्तीतील डिपीची दुरवस्था

महावितरणचा अनागोंदी कारभार : ग्रामस्थ अंधारात

ठोसेघर –ठोसेघर परिसरातील चिखली ग्रामपंचायतीमध्ये मोडणाऱ्या धनगर वस्तीला विज पुरवठा करणाऱ्या डिपीची गेल्या कित्येक महिन्यांपासून दुरावस्था झाली आहे. तर विजेचे खांबही वाकले आहेत. त्यामुळे धनगर वस्तीतील विज पुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे महावितरणच्या दुर्लक्ष आणि निष्काळजीपणामुळे धनगर वस्तीतील नागरिकांना अंधारात राहण्याची वेळ आली आहे. परिणामी ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ठोसेघर परिसरातील दुर्गम भागातील चिखली ग्रामपंचायतीमध्ये मोडणाऱ्या धनगर वस्तीतील विज पुरवठा करणाऱ्या डिपीची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे. डिपीची पेटीच कित्येक महिन्यांपासून गायब असल्याने डीपीतील फ्युज उघड्यावर आहेत.

डिपीमध्ये वारंवार शार्टसर्किट होऊन विज पुरवठा कित्येक दिवस खंडित होत आहे. शार्ट सर्किटने धनगर वस्तीतील घराला आग लागण्याची घटना ग्रामस्थांच्या प्रसंगावधाने थोडक्‍यात टळली आहे. तर डिपीच्या परिसरात वाळलेले गवत आणि झुडुपे असल्यामुळे शार्ट सर्किटने वनवा लागण्याचा धोकाही निर्माण झाला आहे. विद्युत खांबही वाकले असुन कधी कोसळतील याचा नेम नाही. त्यामुळे एखादी दुर्घटना घडली तर जबाबदार कोण असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, याबाबत कित्येक महिन्यांपासून वेळोवेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारी करून देखील कोणतीही दखल घेतली जात नसल्यामुळे महावितरणच्या भोंगळ कारभारावर ग्रामस्थांनमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. महावितरणने विजेचे खांब आणि डिपीची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनकडून होत
आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)