कणकवलीत पारकर-नलावडे गटात तुफान राडा

सिंधुदुर्ग: कोकणाच्या राजकीय नकाशावरील संवेदनशील केंद्र असलेल्या कणकवलीमध्ये आज पुन्हा एकदा राडा झाला. नगराध्यक्ष समीर नलावडे समर्थक आणि माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर समर्थक यांच्या गटात किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यावसान हाणामारी आणि तोडफोडीत झाले. हा प्रकार कणकवली कॉलेज रोड येथे दुपारी साडे बाराच्या सुमारास घडला.

नगराध्यक्ष समीर नलावडे समर्थक आणि माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर समर्थक यांनी एकमेकांना प्रसाद दिला. दरम्यान या प्रकरणानंतर येथील वातावरण तंग झाले. त्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी फौजफाटा तैनात केला आहे. यात पारकर यांच्या निवासस्थानासमोर असलेल्या दोन दुचाकींचे नुकसान झाले. तसेच काहींना मारहाण करण्यात आली. मात्र बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. नगरपंचायत निवडणुकीत एका उमेदवाराचे काम केल्यावरून गेले काही दिवस अंतर्गत वादंग सुरू होता. आज नगराध्यक्षांना अपशब्द उच्चारल्यावरून वादंगाचे पर्यावसान हाणामारीत झाले.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)