‘त्याने’ चक्क विमानच चोरले

न्यूयॉर्क: आजपर्यंत तुम्ही सायकल चोरी, बाईक चोरी, कार चोरी, इत्यादी चोऱ्यांबद्दल ऐकले असेल पण जर एखाद्याने विमानच चोरले तर? अतिशयोक्ती वाटते ना? पण ही अतिशयोक्ती नसून अमेरिकेतील सीएटल विमानतळावरुन विमान कंपनीच्याच यांत्रीकी विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने विमान चोरल्याची घटना घडली आहे. हे चोरीचे विमान काही वेळाने जवळच्याच एका बेटावर कोसळले यावेळी विमानात एकही प्रवासी नसल्याने कोणतीही जिवीत हाणी झालेली नाही.
अशा या आगळ्या वेगळ्या चोराने एअर ट्रॅफीक कंट्रोल रूम सोबत संपर्क साधत मागणी केली की, मला तुमच्या कंपणीमध्ये पायलट म्हणुन नौकरी देत असाल तरच मी हे विमान सुरक्षीत रित्या उतरवेल मी खुप निराश झालेलो असून त्या निराशे पोटी आपण हे कृत्य केले असल्याचे देखील त्याने सांगितले. यानंतर त्याने विमानातील इंधन संपायला आले आहे अशी माहिती दिल्याने काही काळ त्या ठिकाणी तनावाचे वातावरण होते.
यावेळी विमानतळावरील सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे “एका व्यक्तीने बेकायदेशीररित्या विमानाचा ताबा घेऊन विमानाचे उड्डाण केले. यामुळे सीएटल ताकोमा आंतरराष्ट्रीय विमानतळ काही काळासाठी बंद करावे लागले.” विमान कोसळल्यानंतर विमानचोर कर्मचारी त्यातून वाचला आहे की नाही हे अद्याप समजलेले नाही. स्थानिक शहराच्या शेरिफ ऑफिसने दिलेल्या माहितीनुसार विमान पळवणारा माणूस 29 वर्षांचा होता त्याचे नाव अजुन उघड केले गेले नसले तरी त्याचा कोणत्याही दहशतवादी संघटनेशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसून ही एक चोरीची घटना आहे असेही त्यांनी पुढे सांगितले.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)