धावत्या रेल्वेमध्ये साप आढळल्याने प्रवाशांची उडाली भंबेरी 

मुंबई: मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल ट्रेन मध्ये आज सिलिंग फॅनला वेढा देऊन बसलेला साप आढळल्याने प्रवाशांची चांगलीच भंबेरी उडाली. टीटवाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत धावणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये सकाळी ९.३०च्या दरम्यान एक हिरव्या रंगाचा साप फॅनला वेढा देऊन बसल्याचे काही प्रवाश्यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी तातडीने रेल्वेची इमरजेंसी-चैन ओढत गाडी ठाणे स्टेशन जवळ थांबवली. यानंतर सापाला प्रवाशांनी कसेबसे हुसकावून लावत सुटकेचा निश्वास सोडला.
याबाबत बोलताना मध्य रेल्वेचे प्रवक्ते सुनील उदासी यांनी हा साप खोडसाळपणाने कोणीतरी रेल्वेत सोडला असल्याची शक्यता वर्तवली. याबाबत आता रेल्वेचे अधिकारी हा साप इथपर्यंत कसा पोहचला हे जाणून घेण्यासाठी सीसीटीव्हीची तपासणी करत असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)